सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रीपद जाण्यामागे 'सुरजागड'चे कारण?

सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रीपद जाण्यामागे 'सुरजागड'चे कारण?

महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद न देण्यामागे त्यांचा गेम केल्याचे कोणी नाकारीत नाही.  मात्र ते फडणवीस मंत्रीमंडळात राहू नये यासाठी नेमके कोणते कारण असावे? यावर मात्र चर्चेला उधाण आले आहे.  2014 नंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात भाजपा सरकार आल्यानंतर, त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील पंकजा मुंडे, विनोद तावाडे, एकनाथ खडसे यांचा बरोबर गेम केल्यांचा त्यांचेवर आरोप होत आहे.  तशा सर्वत्र बातम्या प्रकाशीत झाल्या आहेत.  या तिघानंतर, सुधीर मुनगंटीवार यांचा नंबर लागेल अशीही माध्यमात चर्चा होती.  2024 च्या निवडणूकीत सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार म्हणून मोठा विजय मिळविल्यानंतरही त्यांचे मंत्रीपदाचे वाटेवर काटेच आल्यांने, त्यांचाही खडसे झाल्यांची चर्चा आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचा 'गेम' नेमका का करण्यात आला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पदाचे मार्गात मुनगंटीवार हे सद्याच्या राजकीय परिस्थितीत निश्चितच अडथळा नव्हते.  मागील काही वर्षापासून, भाजपातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी स्वत:त बदल करवून घेत, नेतृत्वाशी जुळवून घेतले होते.  अशा परिस्थितीत मंत्री म्हणून अनुभवी आणि आपल्या कल्पकतेने राज्यात अनेक निर्णय घेवून चर्चेत असलेले मुनगंटीवार यांना डच्चू देण्यामागे 'सुरजागड'चे कारण असावे असाही तर्क लावल्या जात आहे.

गडचिरोली जिल्हयात सुरजागडची लोहखदान आहे.  या लोहखदानीतून मिळणार्या मलिदावर अनेक राजकीय नेत्यांचा डोळा आहे.  सुरजागड मध्ये भाजपाच्या केंद्रिय नेतृत्वातील एका बड्या मंत्रीच्या मुलांच्या कंपनीची मोठी गुंतवणूक असल्याची या परिसरात जोरदार चर्चा आहे.  सुरजागडच्या कमाईवर डोळा ठेवूनच, खनिज मधून मोठी संपत्ती मिळते  याचा अनुभव आल्याने राज्यातील नेतृत्वालाही सुरजागडची भुरळ पडली आहे.  भविष्यात याच खदानीमुळे मोठे प्रकल्प या भागात येणार आहे.  अशावेळी गडचिरोलीसह चंद्रपूरच्या प्रशासनावर आपले नियंत्रण राहीले तरच, या प्रकल्पाचे आणि चंद्रपूर जिल्हयातील कोळसा, लाईमस्टोनसह इतर खनिजामधून संपत्ती उभी करता येवू शकते हे लक्षात येताच, चंद्रपूर—गडचिरोलीवर नियंत्रण ठेवण्यांच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या.  सुधीर मुनगंटीवार यांचे सरळ राजकारण असल्यांने, त्यांचा 'बंदोबस्त' केल्याशिवाय, गडचिरोली—चंद्रपूर जिल्हा प्रशासनावर वर्चस्व निर्माण करणे अशक्य होते. यासाठीच मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री होवू नये म्हणून मंत्रीपदावरून त्यांचा पत्ता कापला काय? अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गडचिरोली जिल्हयातील इतर खदाणीसह सुरजागडच्या मलिदात वाटेकरी नको म्हणून, खुद्द गडचिरोली, गोंदिया जिल्हयातूनही मंत्रीपद दिले गेले नाही हे येथे महत्वाचे आहे. 

मागील काही वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुनगंटीवार यांचेपेक्षा चिमुरचे आमदार बंटी भांगडीया यांचेशी सलगी सर्वऋुत आहे. आमदार बंटी भांगडीया हे व्यापारी तसेच मोठे कंत्राटदार आहेत.  त्यांचेच चिमूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात एका बंडखोर उमेदवारास 'रसद' पुरविण्यात आल्याचीही चर्चा आहे.  बंटी भांगडीया यांना मंत्री करून, त्यांना पालकमंत्री केल्यास, अनेकांचे भले होईल असे कयास लावून, मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्यानंतर काही काळानंतर भांगडीया यांना मंत्रीपद देण्यांची योजना असावी अशीही चर्चा आहे.

खरंतर गडचिरोली-गोंदिया-भंडारा हे तीन जिल्हे नक्षलग्रस्त जिल्हे आहेत आणि चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. मात्र फडणवीस मंत्रिमंडळात या तीनही जिल्ह्याला एकही मंत्री पद मिळाले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार भाजपाचे निवडून आले असल्याने, या जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री करणे हे न्यायाला धरून होते मात्र खदानीच्या वाट्यात वाटेकरी नको म्हणून तर त्यांना मंत्री पदापासून दूर ठेवले असावे अशीच सर्वत्र चर्चा आहे.

६ टिप्पण्या:

  1. सुधिर मुनगंटीवार यांना विरोध हा फक्त
    बामण लाबीचा आहे बाकी कुणाचा नाही
    जाया जिल्हयातून इतके उत्पन्न आहे त्या
    जीलाला मंत्री पद्ध नाही नवल वाटते
    म्हणून जय vidharb vidharb वेगळा v
    Vidhard

    उत्तर द्याहटवा
  2. सुधिर भाऊ ना मंत्री पदातून नाकारणे म्हणजे विकासाला डच्चू सर्वांना प्रिय नेत्या ला मंत्री पदातून . डावलून विकासाला ब्रेक निश्चित लोकाच्या इच्छेवर पाणी फेरणारा निर्णय?

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!