जांभुळघाट-भिसी मार्गावर चार चाकी वाहानाने दूचाकी वाहानाची समोरा-समोर जोरदार धडक
एकाचा जागीज मृत्य तर दुसऱ्याची परीस्थिती गंभीर
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - दि.29 डिसेंबर २०२४ ला चिमूर तालूक्यातील जांभुळघाट - भिसी मार्गावर पारडपार बस स्टॉप जवळ चार चाकी व दूचाकी वाहणाच्या अपघातात अभिशेक अंकोश बारेकर रा.आंबेनेरी ता.चिमुर जि.चंद्रपुर वय अंदाजे 28 वर्ष याचा जाग्यावरच मृत्यू झाला असुन दुसरा प्रदीप दिलीप जांभुळे रा.आंबेनेरी ता.चिमुर जि.चंद्रपूर वय अंदाजे 24 वर्ष याची शुध्दा परीस्थिती गंभीर असुन त्याला नागपुर येथे हलवण्यात आले आहे .
स्कॉरपिओ वाहन हे जांभुळघाट कडून भिसी कडे जात होते तर दूचाकी वाहन हे आंबेनेरी वरून जांभुळघाट कडे येत असुन पारडपार बस स्टॉप समोर दोन्ही वाहणाची समोरा-समोर भिडंत होऊन अपघात झाल्याने दूचाकी वाहाणावरच एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असल्याने त्यास नागपुरला हलवण्यात आले आहे. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!