रेती माफिया यांना आशीर्वाद तरी कुणाचा
विना पासिंग ट्रॅक्टर शोरूम मधून ग्राहकांना कसे दिले जातात
प्रादेशिक परिवहन विभाग यांचे याकडे दुर्लक्ष का?
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - नोंदणीकृत नसलेले ट्रॅक्टर ट्रॉली अवैध रेती तस्करी करीता चिमूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. चिमूर क्षेत्रात वाढते रेती तस्करीचे प्रमाण जोमात आहे. शासनाचा महसूल दैनंदिन चोरी करून रेती तस्करी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले असून शासनाची कामे असो अथवा खाजगी बांधकाम असो रेतीची आवश्यकता असतेच बिना रॉयल्टीची रेती ही शासनाच्या कामात सर्रास कसलीही भीती न बाळगता वापरले जाते याकडे याकडे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सुद्धा काना डोळा करत असतात. असाच एक प्रकार दिनांक. २३ डिसेंबर २०२४ ला घडला मौजा सावरगाव वाघमारा शेत शिवारात ०८ कि.मी. पूर्व वेळ रात्री ११:३० वाजता सुरु करून १२:०० वाजता पर्यंत घटनास्थळ पंचनामा करीत दिनांक. २४/१२/२०२४ ला पहाटे ०४:०५ मिनिटांनी चिमूर पोलीस स्टेशनला अप क्र.व कलम ४५७/२०२४ कलम ३०३ (२) ४९ भा न्याय सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार फिर्यादी पोलीस शिपाई ब.नं.३३९ हर्षल अशोक शेरकुरे वय २४ वर्षे पोलीस स्टेशन चिमूर जिल्हा चंद्रपूर व आरोपीची नावे क्रमांक.(१) ट्रॅक्टर चालक सुशील श्रीधर कुळमेथे वय २२ वर्षे राहणार पिंपळनेरी चिमूर , (२) ट्रॅक्टर मुंडा ट्रॉली मालक नितीन दिपक केमये वय २२ वर्षे राहणार पिंपळनेरी चिमूर , (३) ट्रॅक्टर चालक अमित संतोष चौधरी वय २४ वर्षे राहणार पिंपळनेरी चिमूर (४) ट्रॅक्टर मुंडा ट्रॉली मालक किशोर धोंडबाजी पंढरे वय ६० वर्षे पिंपळनेरी चिमूर तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथिल सर्वजण असून विना पासिंग नंबर नसलेली दोन्ही ट्रॅक्टर मुंडा तसेच ट्रॉली सहित चिमूर पोलीस स्टेशन ला वाहने जप्त करण्यात आली असून रेतीसह दोन्ही ट्रॅक्टर मुंड्यांचा एकूण १० लाख १६००० रुपये किंमतीचा मुद्देमालावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत चे पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात अन्वेंषण अधिकारी सपोनि मल्हारी ताळीकोटे पोलीस स्टेशन चिमूर करीत आहे.परंतु ट्रॅक्टर डीलर शोरूम मालक यांनी हा बिना नंबर रजिस्ट्रेशन न झालेला ट्रॅक्टर ग्राहकांना दिला कसा याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. यावरून शोरूम मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा व त्यांना दिलेला ट्रॅक्टर वाहन विक्री पारवाना सुद्धा रद्द करण्यात यायला हवा. अशाप्रकारे कित्येकदा वाहने चिमूर क्षेत्रात पकडली गेली तरी सुद्धा यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांनी कारवाई केली नाही रेती भरलेल्या ट्रॅक्टरची पोलीस स्टेशनमध्ये असतानाच ट्रॅक्टर डीलरनी नोंदणी का केली असाही प्रकार उघडकिस आला होता. तेव्हाही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी त्या डीलर विरोधात कोणतीही कारवाई केली नाही म्हणून याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन खरोखर गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी याकडे परिवहन विभाग चंद्रपूर यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!