अज्ञात वाहनाचे धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू नागभिड तळोधी बा. मार्गावरील चिंधीमाल फाटा जवळील घटना
तळोधी (बा.) : 28 डिसेंबर 2024
धानाचा काटा करून स्वतःचे चिंधीचक या गावी सायकलने परत येणाऱ्या एका सायकल स्वाराला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी नागभीड ते तळोधि बाळापूर मार्गावरील चिंधीमाल फाट्याजवळ सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. ईश्वर नागो देवगड (वय 65) रा. चिंधीचक असे मृताचे नाव आहे.
चिंधीचक येथील रहिवासी मृत्तक ईश्वर नागो देवगडे हा आज शनिवारी चिंधीमाल येते स्वतःच्या धानाचा काटा करण्याकरता धान व्यापाऱ्यांकडे गेला होता. धानाचा काटा केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास तो स्वतःचे गाव चिंधीचक येथे सायकलने यायला परत निघाला होता. चिधिंमाल फाट्याच्या समोर सायकलने येत असताना मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. जबर धडक एवढी जबर होती की सायकलच्या दोन ते तीन तुकडे झाले आणि सायकल स्वार ईश्वर देवगडे यांना जब्बर मार लागला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नागभिड पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून नागभीड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. अज्ञात वाहनाची अद्याप ओळख पटलेली नाही. पुस्तकाच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुली नातवंड असा परिवार आहे. त्यांचे मृत्यूने कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!