राळेगाव लगत शेतामध्ये दोन वाघाचे दर्शन... वनविभाग, शेगाव पोलीस यांची उपस्थिती..

राळेगाव लगत शेतामध्ये दोन वाघाचे दर्शन... 
वनविभाग, शेगाव पोलीस यांची उपस्थिती..


वरोरा... जगदीश पेंदाम

तालुक्यात येत असलेल्या  राळेगाव लगत शेतामध्ये आज दुपारच्या वेळी दोन वाघाचे दर्शन झाले वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये  गर्दी केली होती, गाव लगत शेत शिवारामध्ये वाघ आल्याने शेत शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांना मनात भीतीची वातावरण निर्माण झाले त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेले शेतमजूर आपली हातातील कामे सोडून आपला पळ काढला. राळेगाव तसेच परिसरातील नागरिकांनी या वाघाला पळविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, फटाक्याची आतिषबाजी केली असता वाघ जवळच असलेल्या झाडीमध्ये दडी मारून बसल्याने या शेत शिवारात भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेल्या महिलांनी देखील आपला पळ काढला व गावाकडे परत आल्या व गावात व गाव परिसरात एकच खळबळ धावा धावा वाघ आला हिचं बोंब परिसरात पाहायला मिळाली..

राळेगाव लगत निमढेला पर्यटन गेट असून दोन्ही वाघ त्या दिशेने जाण्यास निघाले असता परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केल्यामुळे रात्रीच्या अंधारात जंगलाच्या दिशेने जाण्यास दोन्ही वाघाला त्रास होत असुन वनपरिक्षेत्र अधिकारी चिमुर देऊळकर व वनविभागानची टीम दाखल असून शेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार योगेंद्रसिंग यादव,पोलीस सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे,सायंकाळ पर्यंत गावकऱ्यांनी सभोवताली गर्दी केल्यामुळे रात्री दोन्ही वाघाला जंगलाच्या दिशेने जाण्यास अडथळा निर्माण झालेला  आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!