गोंडवाणा गणतंत्र पार्टीचा पाठींबा नेमका कुणाला?

गोंडवाणा गणतंत्र पार्टीचा पाठींबा नेमका कुणाला?

बल्हारपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.  गोंडवाना गणतंत्र पार्टीचा पाठींबा नेमका कुणाला आहे?  निवडणूकीचा प्रचार थांबण्याकरीता 48 तासापेक्षा कमी कालावधी असूनही अजूनपर्यंत याचा उलगडा झाला नाही.  उल्लेखनीय म्हणजे, गोंडवाणा गणतंत्र पार्टीने आपला अधिकृत उमेदवार, मनोज धर्मा आत्राम यांना विधानसभेच्या निवडणूकीत उतरविले आहे.  मात्र पार्टीचे अन्य नेते, आपल्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी, आप—आपल्या समर्थक नेत्यांना 'समर्थन'चे पत्र देत सुटले आहे.  आपले समर्थन देत असतांनाच, आपणच कसे अधिकृत आहोत हेही सांगण्याचा प्रयत्न हे समर्थक पाठीराखे करीत आहे.

उल्लेखनीय म्हणजे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अधिकृत उमेदवार मनोज धर्म आत्राम यांचे प्रचार बॅनरवर जिल्हाध्यक्ष बापूजी मडावी यांचेही छायाचित्र प्रकाशित झाले आहे.

मागील काही वर्षापासून पोंभूर्णा तालुक्यात आदिवासींचे विविध ​प्रश्नावर आंदोलन करून शासनाला विशेषत: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घेरणारे जगन येलके यांनी मागील काही महिण्यापासून, सुधीर मुनगंटीवार सोबत बैठक, चर्चा करून, मुंबईत राज्यपालांची भेट घेवून प्रश्न सोडविण्यांचा प्रयत्न केला.  यानंतर, आदिवासींचे प्रश्न फक्त सुधीर मुनगंटीवारच सोडवू शकते अशी भूमिका घेत, गोंडवानाचा पाठींबा सुधीर मुनगंटीवार यांना दिला.

कॉंग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांना गोंडवाना गणतंत्र पार्टीचा पाठींबा असल्यांचे अधिकृत पत्रक या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापुजी मडावी यांनी काढून, परस्पर मुनगंटीवार यांना पाठींबा दिल्याबद्दल जगन येलके यांचे विरोधात भुमिका घेत, त्यांना पोंभूर्णा तालुका अध्यक्ष पदावरून काढल्यांचे जाहीर केले.

कॉंग्रेसकडून उमेदवारीचा दावा करणार्या, अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांनाही राष्ट्रिय गोंडवाना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष राकेश राजु भलावी, प्रदेश सचिव कमलेश नैताम, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशील कोडापे यांनी पत्रक काढून पाठींबा दिला आहे.  आदिवासींच्या हक्कासाठी डॉ. गावतुरे हेच लढा देतील असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अधिकृत उमेदवार मनोज आत्राम यांचेकडे दुर्लक्ष करून, पार्टीचे नेते, आदिवासीचे नेते मात्र गैरआदिवासी नेत्यांवरच विश्वास टाकत आहेत.  मतदार मात्र कुणावर विश्वास टाकतील याचा फैसला मतदार 20 नोव्हेंबरच्या ​मतदानातून ठरणार आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!