निवडणुकीच्या धामधुमीत रस्त्याचे काम कसे? काम अधिकृत की बनावट?
निवडणुकीच्या धामधुमीत रस्त्याचे काम कसे? काम अधिकृत की बनावट?
निवडणुकीच्या तोंडावर तात्काळ रस्त्याचे काम सुरू
किरण वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर तात्काळ कामाला सुरुवात
ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीला यावर्षी महाविकास आघाडीचे उमेदवार विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात महायुतीने कृष्णा सहारे हा ओबीसी चेहरा दिल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. महायुतीच्या उमेदवाराला मतदारांची दिवसेंदिवस पसंती मिळत आहे. विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ मतदारसंघांमध्ये त्यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार गावोगावी व गल्लो गल्ली भेटी देत या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच मतदारांच्या समस्या जाणून घेत असून तात्काळ निवडणुकीच्या तोंडावर समस्येचे निराकरण करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ही आचारसंहितेचा भंग करणारी घटना आहे का असा प्रश्न आला मतदार करू लागलेला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार यांनी खरकाडा येथील गावामध्ये काल दिनांक 15 नोव्हेंबरला जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी खरकाडा मार्गाची दुरावस्था असल्याने वडेट्टीवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. किरण वडेट्टीवार यांनी नागरिकांना तत्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. व खरकाडा पोचमार्गाचे खड्डे बुजविण्याचे डागडुजी चे काम दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबरला तात्काळ सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. राज्यात आचारसंहिता लागू आहे. अशातही एका दिवसात कशी काय शासकीय मंजुरी प्राप्त झाली. वर्क ऑर्डर कसे निघाले? खरोखर शासनाकडून मंजुरी करण्यात आली की थातूरमातूर काम करून मतदारांना दंडविण्याचा हा प्रयत्न आहे याची चर्चा मतदारात आहे. मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मतदारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!