लाखो रुपयाचा रस्ता बनला डम्पिंग ग्राउंड

शासनाच्या स्वच्छ भारत मिशनला हडताळ

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - स्वच्छ भारत मिशन चे तीन तेरा शेगाव ग्रामपंचायत ने वाजवली असून मुख्य बाजारपेठेला लागून असलेला लाखो रुपयाचा रस्ता तसेच संडास, बाथरूम डम्पिंग ग्राउंड तयार होऊन परिसरात सगळीकडे दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांच्या आरोग्याच्या धोका निर्माण झालेला आहे.शेगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी नागरिकांना सुविधेचा अभाव नेहमीच पाहायला मिळत असते,  या ठिकाणी ग्रामीण भागातील जनता शेगावला मोठ्या प्रमाणात नेहमीच येत असून 50 ते 60 खेडे या बाजारपेठेला जोडलेली आहे, मात्र त्याचे काही देणे घेणे शेगाव ग्रामपंचायतला आवश्यक नसल्याचे दिसून येत आहे शेगाव मध्ये लाखो रुपयाचा रस्ता,संडास, बाथरूम हे कचऱ्याच्या ढिगार्‍यामध्ये विखुरले आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्यासहित दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या ग्राहकांना व परिसरात असलेल्या दुकानदारांना साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झालेला आहे.या ठिकाणी छोटे मोठे दुकानदार, व्यवसायिक या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे या परिसरात किराणा दुकान, पान टपरी,चहा, नाश्त्याची दुकान, फ्रुटची दुकान, फळे, गुपचूप, स्वीट ची दुकान, मंचुरियन,हार भंडार दुकान मोबाईल शॉपी, वेल्डिंग वर्कशॉप, हार्डवेअर, जनरल दुकान आहे, दुर्गंधीमुळे अनेक दुकानदाराची ग्राहक कमी झाले असून, दिवाळीमध्ये साजरा होणारा भाऊबीज, कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो त्यामुळे महिलांनी दुकानदाराकडे पाठ फिरवली आहे. महिलावर्ग कपड्याचे,भांडीचे खरेदीसाठी येत असतात परंतु लघुशंकेसाठी दुकानदार सहित महिलाना, ग्राहकांना, परिसरातील नागरिकांना, मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत या ठिकाणी दोन बाथरूम बांधकाम ग्रामपंचायत केले असून जवळपास सात ते आठ लाखाचे रुपयांची बांधकाम आहे तसेच सिमेंट काँक्रीट रोड सुद्धा पाच ते सात लाख रुपयांचा जवळपास केलेले आहे या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरच सडलेल्या कचरासहित दुर्गंधी असल्यामुळे कोणीही त्याच्या वापर करू शकत नसल्यामुळे लाखो रुपये हे सध्या तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे निष्काळपणामुळे कचऱ्याच्या ढिगरामध्ये पडलेली आहे.एकीकडे शासन स्वच्छतेकडे मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात मात्र शेगाव ग्रामपंचायत प्रशासन अपवाद ठरत तीन तेरा वाजवत जनतेच्या आरोग्याशी खेळताना दिसत आहे, तसेच ग्राम स्वच्छतेसाठी नेहमी आग्रही असणारे महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासन सुद्धा  शेगाव ग्रामपंचायतच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करत नसल्यामुळे 60 ते 70 गावातून येणाऱ्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.स्वच्छ भारत अभियानाचे वरिष्ठ पातळीवरून तालुक्यातील ग्रामपंचायत आदेश दिलेले असतात, त्याचे पालन देखील बहुतांशी ग्रामपंचायतने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!