डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे बंडखोरीमागे नाना पटोलेचा आशिर्वाद?
डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे बंडखोरीमागे नाना पटोलेचा आशिर्वाद?
बल्हारपूर विधानसभेचे चित्र हळूहळू स्पष्ट होवू लागले आहे. या मतदार संघात तिहेरी लढत होणार हे निश्चित झाले. महाविकास आघाडीकडून ओबीसी चेहरा आणि फुले—शाहू—आंबेडकराचे विचाराच्या नेत्या म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दावेदारी केली होती. त्यांनी उमेदवारी मागीतल्यांने, अखरेच्या क्षणापर्यंत कॉंग्रेसने बल्हारपूरात उमेदवारी जाहीर केली नाही. अखेर कॉंग्रेसचे निष्ठावंत, मागील 30 वर्षापासून या क्षेत्रात कॉंग्रेस जिवंत ठेवणारे, स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसला यश मिळवून देणारे संतोष रावत यांचेवर पक्षानी विश्वास टाकून उमेदवारी जाहीर केली.
संतोष रावत हे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक आहेत. संतोष रावत यांच्या उमेदवारीचा किल्ला मुंबई—दिल्ली दरबारी त्यानीच लढविला. रावत यांचे उमेदवारीला खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विरोध असल्यांच्या बातम्या माध्यमात प्रकाशीत होत होत्या.
भूमिपुत्र बिग्रेडच्या संस्थापिका डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी लोकसभेच्या निवडणूक दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांचे समवेत मुंबईत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे उपस्थितीत कॉंग्रेस प्रवेश केला. तेव्हापासूनच, विधानसभेत कॉंग्रेसकडून त्या दावेदार राहतील अशी चर्चा होती. माळी—कुणबी (डॉ. गावतुरे या कुणबी समाजाची तर त्यांचे पती हे माळी समाजाचे) मतदारांचा विचार करता, त्याची उमेदवारी कॉंग्रेसकरीता लाभाची राहील असा सूर होता. त्यांचेसाठी खुद्द नाना पटोले यांनीच जोरदार फिल्डींग लावली होती, खुद्द प्रदेशाध्यक्षानीच डॉ. गावतुरे यांचे नांव पुढे केले. उमेदवारीसाठी अखेरपर्यंत आग्रही राहीली होते. डॉ. गावतुरे या नाना पटोले यांचे नात्यात असल्यांच्या चर्चाही होत्या. मात्र त्या पक्षात नवख्या असल्यांने मुळ कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा त्यांचे उमेदवारीस असलेला प्रचंड विरोधामुळे नाना पटोले यांचे इच्छेला पक्षश्रेष्ठीनी 'ना—ना' केले.
राज्यात कॉंग्रेसमध्ये विदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे बडे नेते आहेत. या दोघांचेही स्वतंत्र गट आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि कॉंग्रेसला मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली तर, अशावेळी आपल्या मागे समर्थक आमदारांची संख्या अधिक असावी असा दोघांचेही प्रयत्न आहे. बल्हारपूरात कॉंग्रेस—भाजपात थेट लढत झाल्यास, कॉंग्रेसचे पारडे जड होवून रावत विजयी होवू शकतात. तसे झाले तर, भविष्यात विजय वडेट्टीवार यांचे पारडे जड होईल या राजकीय भितीनेच, रावत यांची उमेदवारी कमजोर करण्यासाठी डॉ. अभिलाषा गावतुरे यांना या क्षेत्रात बंडखोरी करण्यास नाना पटोले यांनी मुकसमंती तर दिली नाही ना? अशी चर्चा आता मतदार संघात आहे.
पक्षात कुणी बंडखोरी करीत राहीले तर, पक्षश्रेष्ठी त्या उमेदवारांची विनवणी करून, आधीच्या उपकाराची जाणीव करून देत, भविष्यात चांगल्या संधीचे स्वप्न दाखवित, विविध पदाचे गाजर देत किंवा आर्थिक उलाढाल करीत 'बंडोबा' उमेदवाराला 'थंडोबा' करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी विशेषत: राज्यस्तरीय नेते, राष्ट्रिय नेते किंवा ज्यांचे मार्फतीने बंडखोरांनी उमेदवारी मागीतली अशांच्या माध्यमातून पक्ष बंडखोर उमेदवारांला समजविण्यांचा प्रयत्न करतात आणि अशांना यशही मिळते आणि तुरळक बंडखोरी दिसते. बल्हारपूरात डॉ. अभिलाषा गावतुरे यांची बंडखोरी थांबविण्यासाठी मात्र कुणीही प्रयत्न केले नसल्यांचे खुद्द डॉ. गावतुरे यांनी पत्रकारांशी बोलतांना मान्य केले.
ज्यांचे नांव प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी चालविले, असे उमेदवार बंडखोरी करीत असेल तर, त्यांना समजविण्यांची जबाबदारीही नाना पटोलेची होती. प्रदेशाध्यक्ष या महत्वाच्या पदावर काम करीत असतांना त्यांचेच समर्थक उमेदवारांची नाही तर, महाविकास आघाडीत कुणीही बंडखोरी करू नये यासाठी नाना पटोले यांनी प्रयत्न करायला पाहीजे. इतर पक्षात आणि खुद्द कॉंग्रेसमध्येही हे झाले. मात्र बल्हारपूर अपवाद ठरला. बल्हारपूरात नाना पटोले त्यांचे समर्थक उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांना फोनही करू नये हे अनाकलनीय आहे.
बल्हारपूरच्या बंडखोरीतच नाना पटोले यांना भविष्यात राजकीय लाभ दिसल्यांने, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक उमेदवार संतोष रावत यांची उमेदवारी कमजोर करण्याकरीता त्यांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी साधा फोनही केला नसल्याची माहीती आहे. 'उमेदवारी मागे घेण्यासाठी कुणीही संपर्क केला नाही, मात्र माफी मागीतली' असे स्पष्ट मत डॉ. गावतुरे यांनी पत्रकारांचे प्रश्नाला उत्तर देतांना सांगीतले.
महाविकास आघाडीतून शिवसेनेचे संदिप गिर्हे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र मातोश्रीतून उध्दव ठाकरे यांचे विनंतीवरून त्यांनी महाविकास आघाडीचे नुकसान होवू नये म्हणून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुसरे पक्षाचे नेते महाविकास आघाडीतील कॉंग्रेस उमेदवारांचे भले पहात असतांना, खुद्द कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या समर्थक उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साधे फोनही करू नये यातूनच डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे बंडखोरीमागे नाना पटोलेचा आशिर्वाद असल्यांची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विजय सिध्दावार
9422910167

.jpg)



ही बातमी ब्रम्हपुरी आणि बल्लारपूर विधानसभा उमदेवार ठरवण्यात मोठी आर्थिक उलाढाल लपवण्यासाठी लावण्यात आलेली आहे अशे माझे मत आहे
उत्तर द्याहटवाकाँग्रेस च्या योग्य उमेदवार डाँ अभिलाषा ताई गावतुरे-बेहेरे याचे बल्लारपूर मतदार क्षेत्रात OBC प्रॉबल्य असणाऱ्या उमदेवार ला नाकारणे हे भाजप ला जिंकवने आता कुणा पासूनही लपलेले नाही भाजप आता बदनाम करतील आणि चुकीच्या बातम्या पसरवतील त्यामुळे बळी न पडता डाँ अभिलाषा ताई यांना निवडून नवीन इतिहास घडणार आहे याची भनक राजकारण्यांनी लागलेली आहे
उत्तर द्याहटवा