विकासाच्या प्रश्नावर भाजप कार्यकर्त्यांकडून गावकऱ्यास मारहाण
पोलीस प्रशासन तक्रार घेण्यास देत आहेत नकार
कॉर्नर सभेची परवानगी नसतांना सुद्धा घेतल्या जात आहेत सभा
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दुर्लक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.०३/११/२०२४ रोजी रविवारला मौजा बोडधा ता. चिमूर येथे घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी ठाणेदार पोलीस स्टेशन भिसी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चिमूर यांचेकडे रितसर तक्रार घेवून गेले असता दिनांक. ०५/११/२०२४ पर्यंत वारंवार तक्रार दाखल करुन घेत असतांना सुद्धा तक्रार घेतली जात नाही. त्या उलट ठाणेदार पो.स्टे. भिसी व उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर हे तक्रारदारावर दबाव टाकून तक्रारदार व साक्षदारावर यांचेवर गुन्हे दाखल करण्याची दमदाटी करित असून गैरअर्जदारास वाचविण्याचा सर्रास प्रयत्न करित असल्याबाबत ची माहिती तक्रारदार यांचेकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळाली. तक्रारदार शंकर प्रेमकुमार रामटेके वय २३ वर्षे, व्यवसाय शिक्षण मु.बोडचा,पो.नवतळा, ता.चिमूर, जि.चंद्रपूर येथील असून मारहाण करणारे गैरअर्जदार (१) राकेश बरधे, ग्राम पंचायत सदस्य रा. बोडधा, पो. नवतळा, तह. चिमूर, जि. चंद्रपूर (२) योगेश सहारे, बूथ अध्यक्ष रा. बोडधा, पो. नवतळा, तह. चिमूर, जि. चंद्रपुर (३) सदाशिव घोनमोडे, उप सरपंच रा. बोडधा, पो.नवतळा, तह. चिमूर, जि. चंद्रपूर (४) प्रफुल कोलते सरपंच रा. मांगलगांव, तह. चिमूर, जि. चंद्रपूर व इतर असून सविस्तर वृत्त दिनांक.०३/११/२०२४ रोज रविवारला सकाळी १०:०० वाजता बोडधा येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या प्रचारार्थ प्रफुल कोलते सरपंच राहणार मांगलगांव यांची बोडधा येथील हनुमान मंदीर चौकात सभा सुरु होती. तक्रारदार यांनी प्रफुल कोलते यांना कॉर्नर सभेमध्ये प्रश्न विचारले असता त्यांनी पाहारे साल्या महाराला असे म्हटले व लगेच गावातील राकेश बरधे, योगेश सहारे, सदाशिव घोनमोडे यांनी माझ्या अंगावर धावून येवून जातीवाचक शिवीगाळ केली व तुझे भाजपच्या सभेत कोणते काम आहे. असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.व त्यानंतर घटनेची माहीती समाजातील लोकांना मिळाल्या बरोबर समाजातील लोक धावून आले. व मला घरी घेवून गेले. त्यानंतर मी व माझे सोबत समाजातील काही लोक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन भिसी येथे गेलो मात्र ठाणेदार, पोलीस स्टेशन भिसी यांनी माझी तोंडी / लेखी तक्रार दाखल करुन घेतली नाही.तक्रारदार तसेच त्यांचा सहकाऱ्यांना धमकावून लावले. त्यानंतर सर्वजण गावला परत गेल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे बोलावले तक्रारदार आणि त्यांचे सहकारी यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तक्रार दिली. व घडलेला घटनाक्रम सांगीतला. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सुध्दा तक्रार दाखल करुन न घेता तु तक्रार करु नको तुझे आयुष्य बरबाद होईल.तु तक्रार मागे घे, नाहीतर तुझ्यावर आणि तुझ्या सर्व साक्षदारांवर गुन्हे दाखल करुन तुम्हालाच आतमध्ये टाकतो अशी दमदाटी करुन सर्वांना हाकलून लावले. त्यानंतर दिनांक. ०४/११/२०२४ ला ठाणेदार पोलीस स्टेशन भिसी व उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांनी सकाळी ११:०० वाजता चिमूर येथे बोलावून अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वतः तुमची दखल घेत आहे असे सांगून बोलावून घेतले.त्यानंतर तक्रारदार तथा साक्षदार यांचे बयाण घेण्यात आले. व बयाण पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रपूर हे चिमूर वरुन निघून गेल्यानंतर तक्रारदाराणे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांना तक्रारीची (FIR) ची प्रत मागीतली असता अजूनपर्यंत (FIR) दाखल करण्यात आलेली नाही असे सांगण्यात आले. व त्यानंतर ठाणेदार पोलीस स्टेशन भिसी व उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांनी तक्रारदार व माझ्या साक्षदारास आतमध्ये बोलावून धमकावणे सुरु केले. तु तुझी तक्रार मागे घे, तुझे आयुष्य बरबाद होईल, तु जर तक्रार मागे घेतली नाही तर तुला व तुझ्या साक्षदारावर गुन्हे दाखल करुन आतमध्ये टाकू अशी दमदाटी केली. आरोपीना वाचविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमूर व ठाणेदार पोलीस स्टेशन भिसी हे पूर्णपणे प्रयत्न करीत आहेत.असे आरोप तक्रारदार व साक्षदार यांचेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले.तसेच गैरअर्जदार विरुद्ध ऍट्रॉसिटी ऍक्ट अन्वये कारवाई करून भिसी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांचे विरुद्ध निलंबणाची मागणी सुद्धा तक्रारदार यांचेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली. व न्याय न मिळाल्यास तक्रारदार तथा साक्षदार हे सर्वजन मिळून उपोषणास बसणार असेही बोलले गेले.
७४ - चिमूर विधानसभा निवडून निर्णय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक. ०३ नोव्हेंबर २०२४ ला आमचेकडून तसेच आमच्या कुठल्याही विभागामार्फत कॉर्नर सभेची परवानगी देण्यात आलेली नाही असे सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांना या संपूर्ण घटनाक्रमबद्दल विचारणा केली असता ८० टक्के बयान नोंदविले आहे. प्रकरण चौकशीत आहे तसेच तक्रारी बाबतच्या दृष्टीकोनातून येत्या ३ दिवसामध्ये सर्व सत्य समोर येईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!