शंकपूर प्रमाणे भिसी ला शुध्दा ५२ पत्ते चा चालतो जुगार

पोलीस विभागाच्या आशीर्वादाने तर अवैध धंदे सुरु नाहीत ना?

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असुन याकडे पोलीस विभाग हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतांना दिसत आहे.दोन दिवसा अगोदर शंकरपूर येथे गुन्हे शाखा द्वारे मोठा ५२ पत्तेचा जुगार पकडण्यात आला होता. अनेक दिवसापासुन लाखो रूपयाचा जुगार ठेकेदार भरवीत होता. या ठिकानी नागपूर, वर्धा, चंद्रपुर,भंडारा,गोदीया व इतर जिल्हातुन जुवारी जुगार खेलण्यासाठी येत होते.जुगार भरवणारे ठेकेदार तीन ते चार असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.याच प्रमाणे भिसी ला सुद्धा मोठ्या प्रमाणात ५२ पत्ते चा जुगार ठेकेदार भरवीत आहे. पण पोलीस विभाग यांचेकडून आता पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. चिमुर तालूक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुले-आम सुरू असून दारू, सट्टा, जुगार,रेती, अशाप्रकारे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत पण पोलीस प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे कि पोलीसांचे आशीर्वाद आहे.खुले-आम दारू पुरवठा होत आहे.देशी,विदेशी दारू दुकानदार हे ठोक पुरवठा करीत करीत आहे. अश्या प्रकारचे मोठे अवैध घंदे चिमूर तालूक्यात होत आहे.याकडे पोलीस अधीक्षकाने लक्ष देऊन अवैध धंदे यावर आळा घालावे अशी जनते कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!