सुधीर मुनगंटीवार यांचेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा संतोष रावत यांची मागणी
भाजप युतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर आचारसहिता भंगाचा गुन्हा दाखल करून त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार तोफा थांबल्यानंतर येरगाव येथे सभा घेतल्याचे व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाले आहे.
येरगाव येथे सभा आटोपून मुनगंटीवार यांनी कोसंबी येथे सभा घेत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना माहिती झाले. काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांचेसह त्यांचे सहकारी कोसंबी येथे जाऊन मुनगंटीवार यांना सभा थांबविण्याची मागणी केली. मुनगंटीवार यांनी रावत यांच्या सोबत अरेरावीची भाषा केल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्याची आहे. या दरम्यान दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. संतोष रावत यांचे वाहन चालक यांचे मोबाईल हिसकावून त्यांना मारहाण केल्याची तक्रार मूल पोलिसात करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात संतोष रावत यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान मारहाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे या मागणी करिता काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता अखेर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पहाटे चार वाजता या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन सोडले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!