बल्हारपूर मतदार संघातील खरा 'डमी' उमेदवार कोण? मतदारांनी दिले उत्तर!
बल्हारपूर मतदार संघातील खरा 'डमी' उमेदवार कोण? मतदारांनी दिले उत्तर!
बल्हारपूर मतदार संघाची निवडणूक यंदा रंगतदार झाली. कॉंग्रेसकडून उमेदवारीचा दावा दाखल करणार्या आणि उमेदवारी न मिळाल्यांने अपक्ष मैदानात उतरणार्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांचेमुळे या मतदार संघात निवडणूक अधिकच रंगली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत, डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत यांचेवर थेट आरोप करीत, भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे विजयाकरीता, कॉंग्रेसने 'डमी' उमेदवार दिल्यांचा आरोप केला. आपणच, जनतेचे उमेदवार असून, सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करू शकतो असेही त्या बोलल्या. विजयाची खात्री प्रत्येकच उमेदवाराला असते, ती असायला पाहीजे, मात्र आपल्या उमेदवारीचे समर्थन करतांना, दुसर्यांना 'डमी' संबोधणे हे मतदारांना फारसे रूचले नसल्यांचे, इव्हिएम मधून निघालेल्या मतदानातून स्पष्ट झाले. डॉ. अभिलाषा गावतुरे यांची आणि त्यांचे समर्थकांना अपेक्षीत असलेले किमान यश त्यांना मिळाले नसल्यांचे लागलेल्या निकालाने स्पष्ट केले. कॉंग्रेसचे संतोष रावत यांनी, कॉंग्रेसला मिळणार्या पारंपारीक मतापेक्षा कितीतरी अधिक मताधिक्य घेत असतांना, डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केलेल्या प्रचार आणि चर्चेच्या तुलनेत घेतलेल्या अल्प मताने 'डमी' उमेदवार कोण? याचा फैसला मतदारांनी केला आहे. प्रचार यंत्रणेत दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या तुलनेत तसूभरही कमी नसताना मतदान मात्र एवढे कमी का झाले यावर आता मतदारात चर्चा सुरू आहे.
डॉ. गावतुरे यांनी मागील पाच वर्षापासून, बल्हारपूर क्षेत्रात 'राजकीय डाव' टाकण्यांच्या हेतूने सामाजीक कार्याची बांधणी केली. जातीचे समिकरण आणि फुले—शाहू—आंबेडकर यांची विचारधारेवर काम करणारे व्यक्तीमत्व म्हणून स्वत:ची ओळख तयार करवून घेण्यात डॉ. गावतुरे यांना यश आले. 2019 च्या विधानसभेच्या निवडणूकीत वंचितचे राजू झोडे यांनी, अल्प प्रचार साधनांचा वापर करीत 40 हजार मताधिक्य घेतले होते. ऐनवेळी कॉंग्रेसची उमेदवारी मागीतल्यांने, त्यांना उमेदवारी न देता, डॉ. विश्वास झाडे यांचेवर कॉंग्रेसनी विश्वास टाकला. मात्र झाडे—झोडेच्या मतविभागणीत सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत आमदार म्हणून पाठविले. ही पार्श्वभूमी पाहून, डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सहा महिण्यापूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला, उमेदवारीवर दावाही केला. मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. डॉ. अभिलाषा गावतुरे या ओबीसी समाजाच्या त्यातही फुले—शाहू—आंबेडकर यांचे विचाराचे पाईक असल्यांने, त्यांना राजू झोडे यांचेपेक्षा अधिक मतदान होईल असा मतदारांचा समज होता. मात्र झोडे पेक्षा अर्धे मतदान पडल्यांने निकालानंतर अनेकांच्या अपेक्षाभंग झाले.
राजू झोडे हे विजयासाठी संघर्ष करीत होते म्हणून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते, मात्र डॉ. अभिलाषा गावतुरे या विजयापेक्षा कुणालातरी 'कमी' करण्यासाठी लढत असल्यांचे त्यांचे प्रचार नियोजनावरून चर्चा सुरू झाल्यांने, त्यांना झोडे ऐवढेही मताधिक्य घेता आले नसल्यांचे मतदारात आता चर्चा आहे. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे मताधिक्य कुठे कमी करता येईल अशा ठिकाणीच 'केटली' गरम झाली होती. त्यामुळे त्या कुणाचे मतदान कमी करणार होते हे स्पष्ट होते. बल्हारपूर तालुक्यात 16 तारखेपर्यंत 'दलित—मुस्लीम' समाज केटलीच्या बाजूने होता. तसे संकेतही या दोनही समाजात 'मतदानाचे' समन्वय करणार्या चंद्रपूरच्या एका मोठ्या मुस्लीम समाजाचे नेत्यांनी आमचे प्रतिनिधीजवळ ही बाब स्पष्ट केली. मात्र अखेरच्या टप्यात डॉ. अभिलाषा गावतुरे या विजयासाठी लढत नसल्यांचे लक्षात आल्यांने, आमची गठ्ठा मते, पंजाकडे वळविण्यांचा निर्णय घेतल्यांचे त्यांनी सांगीतले. बल्हारपूर तालुक्यात अपेक्षीत मतदान न झाल्यानेच, केटलीत चहा जास्त शिजला नाही. या अर्थाने, पंजाला डमी उमेदवार म्हणणारे डॉ. अभिलाषा गावतुरे या कुणाला तरी पाडण्याकरीता 'डमी' उमेदवारी दाखल केली काय? असा मतदारांना प्रश्न पडत आहे.
.jpg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!