७४- चिमूर विधानसभा निवडणुकीकरिता उभे असलेले अपक्ष उमेदवार मनोज मडावी यांचा काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. ०८ नोव्हेंबर २०२४ ला गोंड समाजाचे नेते तथा अपक्ष उमेदवार मनोज मडावी यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सतीश वारजूकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला असून गोंड समाज हा काँग्रेस पक्षाचा मतदार राहिलेला आहे.आणि काँग्रेस पक्ष हा गोंड समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढा देईल या विश्वासाने जाहीर पाठिंबा दिला असून दैनिक काँग्रेस पक्षाचा प्रचार प्रसार करीत काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता एकनिष्ठ राहील अशी ग्वाही देत काँग्रेस कार्यालयात गोंड समाजासोबत एकत्रित आले. यावेळी माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर,अपक्ष उमेदवार मनोज मडावी, नितिन कटारे, अविनाश अगडे, विलास मोहिनकर,विनोद ढाकुनकर,पवन बंडे,रोशन ढोक,राजु चौधरी,राकेश साटोने, दागोजी वरखडे,दिपक कुमरे, विजय मसराम, यशवंत वराडे,चेतन मसराम, प्रदिप कुमरे, रामदास सोयाम व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!