शेतकऱ्यांनो सावध व्हा! नाहीतर आत्महत्या शिवाय पर्याय नाही....
शेतकऱ्यांनो सावध व्हा!
नाहीतर आत्महत्या शिवाय पर्याय नाही....
वरोरा.... जगदीश पेंदाम
भारतासारख्या कृषिप्रधान देशात "जय जवान जय किसान" हा नारा केवळ कागदा पुरताच मर्यादित राहिला आहे. सरकार शेतमालाला भाव देत नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे, तर सीमेवर जवान गोळ्या छातीवर घेऊन मरतो आहे पण या बाबतची गांभीर्य आपण निवडून दिलेल्या कोणत्याही लोक प्रतिनिधी किंवा सरकारला नाही त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांनी मताची दान न करता मत कुणाला द्यायचे, याचा गांभीर्याने विचार करावा लागणार, नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या पासून कोणीच रोखू शकणार नाही, हे मात्र निश्चित..
वरोरा, भद्रावती विधानसभा क्षेत्रातने अनेक आमदार निवडून दिले. परंतु या क्षेत्रामध्ये बहुसंख्य मजूर वर्ग आदिवासी,दलित, शेतकरी यासाठी कोणत्याच लोकप्रतिनिधीने या 76 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची विकासात्मक कार्य केलेले नाही. त्यामुळे आजही या वर्गाची स्थिती या 76 वर्षानंतरही फारशी सुधारलेली दिसत नाही. तरी येतील दलित आदिवासी, मजूर, शेतकरी, आपल्यावर अन्याय होत असल्याची यांना जाणीव केव्हा होईल. हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे..
या क्षेत्रामध्ये साधा पंचायत समिती सदस्य निवडून आलेला हजारोच्या घरात संपत्ती असलेल्या कुटुंबातील व्यक्ती अवघ्या पाच वर्षांमध्ये करोडपती होतो, चार चाकी वाहनाने घुमतो, परंतु शेतकरी, गरीब दलित, आदिवासींची उन्नती का होत नाही, हा प्रश्न अजून पर्यंत तरी सुटलेला नाही. कारण याची गांभीर्य कोणी लक्षातच घेत नाही. या लोकांना निवडणूक आल्या की सणासारखे वाटते. हे राजकीय लोक यांच्यासमोर मटन, दारूची नीप दिली की हे खुश होता त्यामध्येच यांचं समाधान असते. परंतु एकदा निवडून आल्यावर हे लोक प्रतिनिधी पाच वर्ष ग्रामीण जनतेचं तोंडही पाहत नाही, शेतकरी,कष्टकरी, शेतमजुराचे काम हे विसरून जातात त्यामुळेच त्याच्या गरिबीचा फायदा घेणारी हे करोडपती बनले, ही वस्तुस्थिती आहे.
हा मूळ प्रश्न बाजूला ठेवून आज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षेत्रामध्ये भाजप, काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेशा संबंधात रोज बातम्या पाहायला मिळतात. मग हे पक्ष प्रवेश करणारी कोण आहेत, याचा सामान्य जनतेला विसर पडलेला आहे. हे कोणत्याच पक्षाचे निष्ठावंत नाही. हे संधी साधू आहेत. हे सामान्य जनतेला केव्हा कळणार असा प्रश्न उपस्थित होतो. असे कितीतरी गाव पातळीवरचे नेते असे आहे कि, या मुख्य राजकीय नेत्यांच्या मागे लागून काही भले होणार नाही, हे माहीत असतानाही गावातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून पक्ष प्रवेश करतात. त्यातूनच त्यांचा व गावाचा विकास खुंटतो, पण यांना गावाच्या विकासा सोबतही अंध भक्तीमुळे काही घेणे देणे नसल्याचं निदर्शनास येत आहे...
शेतकऱ्याच्या मालाला आज 25 वर्षा पासून असलेला भाव किती जनता महागाईपासून त्रस्त असताना व शेतकरी क्षेत्रांमध्ये कर्जाचे डोंगर पसरलेले आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा मान्य न करता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला एम एस पी नुसार भाव, व त्याची गॅरंटी, स्वस्त दरात बी बियाणे, खते, बोगस खताच्या कंपन्यांवर कारवाई इत्यादी मागण्या लिखित स्वरूपात जो पक्ष देईल, त्यांनाच मत द्यावेत पण फुकट मध्ये मताचे दान करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेऊ नये, तरच शेतकरी जगेल.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!