अवैध दारुविक्रेत्यावर कारवाई करावी, जीवनापूर येथील महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन केली मागणी.
तळोधी (बा.)-
नागभीड तालुक्यातील तळोधी बा.पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जिवनापूर येथे अवैध दारूविक्रेत्यां कडून मोठया प्रमाणात अवैध मार्गाने दारुची विक्री होत आहे.तर त्याच्यावर बंदोबस्तात्मक कारवाई करण्यात यावी या बद्दलचे निवेदन घेऊन जीवनापूर येथील महिलांनी तळोदी पोलीस ठाण्याला भेट देऊन मागणी केली.
जीवनापूर गावात गावातच अवैधरित्या व घरपोच दारू मिळत असल्यामुळे गावातील तरुन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत व महिला वर्ग हैराण झाले आहे.त्यामुळे गावातील महिला व पुरुष वर्गाच्या वतीने तळोधी बा.पोलीस स्टेशनचे ठानेदार संगिता हेलांडे याना पोलीस स्टेशन तळोधी बा.येथे प्रत्यक्ष भेट देऊन अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी गावकरी महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
ठानेदार संगिता हेलांडे मडम यांनी गावातील महिला व पुरुष यांना गावात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध व्यवसाय धारकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाईल. असे निवेदन देणारे महिला वर्गाना आश्वस्त केले.
यावेळी जिवनापुर येथील महिला ज्योती मडावी,महानंदा कोवे,संगिता मडावी, बारुबाई मडावी,निर्मला कुळमेथे, दुर्गा कुळमेथे, लता लेंझें, मिनाक्षी कोवे व अन्य महिला वर्ग व गावातील पुरुष मंडळी मोठया संस्खेने उपस्थित झाले होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!