बल्लारपूर मतदार संघातील "या" गावात झाले सर्वाधिक मतदान
72 बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा प्रचार संपल्यानंतर कोसंबी येथे राडा झाला होता. या कोसंबीत कुणाचे पारडे जड आहे, याचा अर्थ त्या दिवशी कुणाचे खरे होते हे सांगणारा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. या कोसंबीच्या बुथकडे जिल्ह्याचे राजकीय वर्तुळाची नजर राहणार आहे. बल्लारपूर मतदार संघात एकूण 366 बुथ आहेत
उल्लेखनीय म्हणजे बल्लारपूर मतदार संघातील 98- 352 बुथ मध्ये सर्वाधिक बंपर मतदान कोसंबी रीठ या बुधवर झाले आहे.
कोसंबी येथे 345 पुरुष मतदार असून 312 महिला मतदार आहेत. एकूण मतदारांची संख्या 657 आहे. यापैकी 323 पुरुष आणि 295 महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 94.6 टक्के मतदान या बुथवर झाला आहे. बल्लारपूर मतदारसंघातील ठाणेवासना, देवाडा बुज, बाबराळा, घनोटी तुकुम, पिंपळखुट, फुलझरी, झरी-पहामी बूथवर 90% पेक्षा अधिक मतदारांनी मतदान केले. या सर्वात कोसंबी रेट मध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.
सर्वात कमी मतदान 69- दुर्गापूर येथे झाले असून येथील मतदानाची टक्केवारी 18.30 आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!