१९३ मतदारांनी केला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
गावाकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी याना जाहीर निवेदन
गावबंदी करण्याचा केला गावकऱ्यांचा निर्णय
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या निमढेला या गावाचे पुनर्वसन तलावालगत असणाऱ्या जागेवर सन १९७६ ते ७७ मध्ये तात्पुरते करण्यात आले होते, हे गाव रामदेगी लगत असणाऱ्या तलाव मध्ये होते.आज या गावात एकूण १९३ मतदाते आहेत. येणाऱ्या विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकावर समस्त गावाकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकी दरम्यान गावात प्रचार करिता येणाऱ्या प्रतिनिधीना गावाबंदी करण्याचा सुद्धा निर्णय या गावाकऱ्यानी घेतला आहे. गावाकऱ्यांनी सांगितले कि मागील ४० वर्षा पासून त्यांच्या मागण्या प्रलंबित असून त्यांना चंदई नाला च्या प्रकल्पावेळी स्थलांतरीत करून त्यांच्या जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते. ते अध्यापही पूर्ण झाले नाही तसेच या बद्दल यांनी कित्तेकदा आंदोनल करत गावाची पुनर्वसनाची मागणी केली अनेक वेळा मुंबई या ठिकाणी जाणे येणे सुद्धा केले. याचा काहीही फायदा झालेला नाही. निमढेला हे गाव चिमूर तालुक्यातील खानगाव या गट ग्राम पंचायतला तात्पुरते जोडण्यात आलेले असून त्याची ऑनलाईन मध्ये नोंद नसल्यामुळे प्रशासन यांच्या निष्कर्जीमुळे जनतेला अनेक वर्षापासून हा त्रास सहन करावा लागत आहे.देशात सगळीकडे ऑनलाईन कारभार सुरु असताना मात्र या गावाचा रेकॉर्ड ना चिमूर पंचायत समितीला आहे. ना वरोरा पंचायत समितला आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला,लोकांचे ऑनलाईन दाखले, ईतर असलेले सगळेच कामे खोळंबले आहे. एवढेच नव्हे तर या गावात खानगाव ग्रामपंचायत मार्फत १५/१७ आदीवासी शबरी घरकुल योजनेचे घरे मंजूर झाले असून निवळ या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकही घरकुल काम सुद्धा सुरु झाले नाही. तसेच या गावाच्या नावावरून ताडोबातील बफर सफारी गेट सुरू आहे, परंतु आजपर्यंत गावच ऑनलाईन मध्ये येत नसल्यामुळे अनेक समस्याने सुविधाने हे गाव वंचित असल्याने शेवटी या गावाकऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!