कवठी येथे नवनिर्माण ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण संपन्न

सावली - तालुक्यातील कवठी येथील जनसुविधे अंतर्गत  २० लक्ष रुपयाच्या किंमतीचे नवीन ग्रामपंचायत भवनाचे उदघाटन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांचा हस्ते करण्यात आले.

       नव्या ग्रामपंचायत भवनासाठी गावकरी लोकांची कित्येक वर्षांपासूनची मागणी होती.  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुरावामुळे नव्या ग्रामपंचायत भावनाच्या कामाला सुरवात होऊन इमारत पूर्ण झाली.   आज भवनाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष नितीन गोहने यांनी ग्रामपंचायत भवन हे ग्राम विकासाचे केंद्र बनावे व युवकांनी गावाच्या देशाच्या विकासासाठी पुढाकार घेत आपला गाव आपला देश सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.

      याप्रसंगी गट विकास अधिकारी वासनिक , विस्तार अधिकारी परसावार , माजी सभापती विजय कोरेवार, सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकार, पो.पाटील सचिन सिदाम, त.मू.स अध्यक्ष टिकाराम म्हाशाखेत्री, शा.व्य.स अध्यक्ष यशवंत भोयर, प्रशांत भोयर सदस्य पो.पाटील रुद्रापुर, शांताबाई बोरकुटे ग्रा.प सदस्य,तसेच कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशासेविका, गावकरी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!