प्रीती भंडारे हिची राज्यस्तरीय शालेय वूशू क्रीड़ा स्पर्धेसाठी निवड

प्रीती भंडारे हिची राज्यस्तरीय शालेय वूशू क्रीड़ा स्पर्धेसाठी निवड


मूल:
क्रीड़ा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीड़ा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय शालेय वूशू क्रीड़ा स्पर्धेचे आयोजन भंडारा येथील बॅडमिंटन हॉल,जिल्हा क्रीडा संकुल मध्ये पार पडली सदर स्पर्धेमध्ये नागपुर विभागतील गडचिरोली,भंडारा, गोंदिया,वर्धा,चंद्रपूर आणि नागपूर ह्या जिल्ह्याचा व नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका चा सहभाग होता.स्पर्धेत मूल येथील नवभारत कन्या विद्यालय ची प्रीती नीलकंठ भंडारे हिने १७ वर्ष आतील वयोगटात व -४५ ह्या वजनगटात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविले व होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत आपली जागा निश्चित केली आहे ती राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या वय आणि वजनगटात नागपूर विभागाचे नेतृत्व करेल.तर माउंट कॉन्वेंट एंड ज्यू. कॉलेजऑफ़ सायंस,मूल चा विद्यार्थी नैतिक चंदू धोबे ह्याने १७ वर्ष आतील (मुले)वयोगटात द्वितीय स्थान मिळवले आहे.
वरील खेळाडू हे वूशू प्रशिक्षक निलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनात कराटे अँड फिटनेस क्लब मूल मध्ये वुशू चे प्रशिक्षण घेतात. खेळाडूंच्या विजयावर नवभारत कन्या विद्यालय,मूल तथा माउंट कॉन्वेंट एंड ज्यू.कॉलेज ऑफ़ सायंस,मूल चे मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापिका,क्रीडा शिक्षक व इतर शिक्षकवृंद आणि कराटे अँड फ़िटनेस क्लब मूल चे संचालक-प्रशिक्षक इम्रान ख़ान तथा पालकवर्ग यांनी आनंद व्यक्त करत राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!