शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार एकाच केंद्रावर "दोन केंद्रप्रमुख"



चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा पुढे आला आहे. मूल तालुक्यातील मारोडा केंद्रात आधीच कार्यरत केंद्रप्रमुख पदावर पद रिक्त नसताना केंद्रप्रमुख म्हणून पुरुषोत्तम महादेव टोंगे यांचे नियुक्ती करण्यात आल्याने हा भोंगळ कारभार पुढे आला आहे. महादेव टोंगे यांची नियुक्ती पदोन्नतीने केल्याचे आदेशात नमूद आहे.
लाचलुचपत प्रकरणामुळे आधीच बदनाम झालेले, चर्चेचा, संतापाचा विषय ठरलेले शिक्षण विभाग नव्या अफलातून कारभारामुळे आता चेष्टेचा विषय ठरले आहे.
मुल तालुक्यात टेकाडी जुनासुर्ला, चिचाळा या केंद्राचे केंद्रप्रमुख पद रिक्त आहे. मात्र नवीन नियुक्ती या रिक्त पदावर न करता, मारोडा येथे केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे हे कार्यरत असताना आणि त्यांची कोणतीही बदली किंवा त्यांना सूचना न देताच टोंगे यांची नियुक्ती करण्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयातून त्यांच्याच सहीने हे आदेश निघाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 11 ऑक्टोबर रोजीचे हे आदेश असून, हे आदेश पाहिल्यानंतर शिक्षण विभाग डुलक्या घेत आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!