पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू - खेडी चिमढा नदी घाटातील घटना
सावली - खेडी येथील शेतकरी कृष्णाजी रामिडवार वय 70 वर्ष हे रविवारी खेडी जवळील नदीकडे बैल चारायला गेले परंतु सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने शोध घेण्यात आला असता नदीच्या काठावर कपडे, चपल, छत्री आढळून आले. परंतु अंधार असल्यामुळे शोध लागला नाही. आज सॊमवारी सकाळपासून आपदा मदत टीम, स्थानिक रहिवासी यांच्या सहकार्याने शोध घेतला असता दुपारी खेडी चिमढा घाटात प्रेत सापडला. त्यांना दीपक, दिनेश मुले असून 2 मुली असा आप्त परिवार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!