गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचा आक्षेप
तालुका काँग्रेस कार्यालय चिमूर येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - सुप्रसिद्ध नाट्य कलावंत गौतमी पाटीलची यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली असून ती तिच्या कलागुणांतून जनतेसमोर नृत्य सादर करीत असते यामुळे ती महाराष्ट्रात सुप्रसिद्ध नाट्य कलाकार म्हणून ओळखली जाते सोशल मीडियावर देखील गौतमी पाटील हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. तिच्या नृत्याचा कार्यक्रम दिनांक. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६:०० वाजता चिमूर शहरातील ग्रामगिता महाविद्यालयाला लागून असलेल्या भव्य मैदानावर आयोजित केला असून हा कार्यक्रम काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येत असल्याची प्रसिद्धी लाऊडस्पीकर च्या माध्यमातून होत आहे. या कार्यक्रमांची प्रसिद्धी करीत असतांना आयोजक जरी दुसरे असले तरी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी यांची नावे येत असल्याने हा कार्यक्रम काँग्रेस ने आयोजित केले आहे असे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे.म्हणून आज दिनांक. ०७/१०/२०२४ ला दुपारी १२ वाजता गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचा विरोध दर्शवीत केलेल्या जाहिरातीचे खंडण तालुका काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले असून या कार्यक्रमाशी तालुका काँग्रेस कमिटीचा कसलाही संबंध नाही असे विजय पाटील गावंडे यांनी परिषदेत म्हटले यावेळी उपस्थित प्रा.रामराऊत सर सहसचिव महाराष्ट्र प्रदेश सेवा दल, विजय पाटील गावंडे तालुका अध्यक्ष, गजानन बुटके तालुका महासचिव, राजेश चौधरी खासदार यांचे स्विय्य सहाय्यक, विजय डाबरे तालुका सचिव,विवेक कापसे तालुका उपाध्यक्ष, अविनाश अगडे शहर अध्यक्ष,आरिफ शेख अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष, पप्पू शेख तालुका मीडिया प्रमुख, रामदास विटाळे, नामदेव डोहे, अक्षय लांजेवार,श्रीकांत गेडाम तालुका अध्यक्ष एन.एस.यु.वाय, राकेश सटोणे विधानसभा युथ काँग्रेस उपाध्यक्ष व आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!