भाजप आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या दबावाखाली भूमिपूजन सोहळा
आम्रवण दिक्षाभूमी सुगतकुटी भिक्कूसंघ संस्था मालेवाडा यांची चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
परवानगी न घेता कार्यक्रम का घेऊ दिले?
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - १ ऑक्टोबर २०२४ ला होणाऱ्या कार्यक्रमाला संस्थेची परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केला. व जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाल्याशिवाय परवानगी देण्यात येऊ नये याबाबत चिमूर पोलीस स्टेशन ला आम्रवण दिक्षाभूमी सुगतकुटी भिक्कूसंघ संस्था मालेवाडा यांची तक्रार दाखल करण्यात आली असून सुगत कुटी भिक्कूसंघ संस्था मालेवाडा हि बौद्धाची धार्मिक संस्था आहे.धर्मदाय उपायुक्त चंद्रपूर येथे नोंदणी केली आहे. नोंदणी क्रमांक F९४६६ र. नं. ४०७/२००५(च) या संस्थेचे मुख्य ११ सदस्य होते. त्यापैकी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मय्यत झाले आहे. संस्थेचे सचिव पूज्य भन्ते सुगदानंदजी ७ ते ८ वर्षांपासून गैरहजर आहेत आणि ८ सदस्य हयात आहेत. या ८ सदस्यांपैकी २ सदस्य संस्थेच्या विरोधात जाऊन कार्य करीत आहेत.संस्थेच्या लोकांचे एकच म्हणने आहे. संस्थेला दान देणारे दिवाकर निकुरे तसेच माजी राज्य मंत्री यांनी संगमरवर दगडाची बुध्दाची मूर्ती दिली. डॉ.अविनाश वारजूकर यांना पण बोलवायला पाहीजे. डॉ.अविनाश वारजूकर यांनी गेट दिला त्यांना पण बोलवायला पहिजे. या क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना सुद्धा बोलवायला पाहिजे. एकाच पक्षाचा कार्यक्रम न होगा सर्व जाती धर्माच्या आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवायला पाहीजे.कोणाच्या जातीय भावना दुखणार नाही. हा कार्यक्रम घेतच आहात तर सर्व मिळून एकजुटीने व्हायला पाहिजे. अशी संस्थेच्या लोकांची भावना आहे.कार्यक्रमात अनुचीत प्रकार घडल्यास यास पवड चे इंजिनियर समीर उपगनलावार जवाबदार राहील. कारण- फाउडेशन ची तोडफोड करून मुर्ती बसवून देण्याचे काम करीत आहेत.मालेवाडा येथील (१) काशीनाथ गजभिये , (२) जगदिश रामटेके हे जवाबदार राहतील याबत ची पत्रकार परिषद वामनजी वाघमारे मालेवाडा ,जगदेव शेंडे मालेवाडा, कृष्णदास खापरडे मासळ, संजय घुटके नेरी यांनी सार्वजनिक उप बांधकाम विभागाच्या शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेत हि माहिती दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!