सावली तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ - शेतपिकांचे प्रचंड नुकसान
सावली तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ - शेतपिकांचे प्रचंड नुकसान
सावली - तालुक्यातील सामदा, वाघोली बुट्टी, सोनापूर या भागात हतीच्या कळापांचा शिरकाव झालेला असून शेतपिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान सुरु आहे.
दोन दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी, सेमाना भागात हत्ती असल्याची माहिती पसरली होती. त्यानंतर काल या भागात आल्याची माहिती आहे. वैनगंगा नदीत भरपूर पाणी असतानाही नदी ओलांडून हत्तीचे कळप सावली तालुक्यात दाखल झाले आहे. यामुळे शेतपिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
27 हत्तीचा कळप तालुक्यात दाखल झालेला असून या भागातून हुसकविण्याचे प्रयत्न वनविभागाच्या टीमकडून सुरु आहे. जनतेनी सतर्कता बाळगावी.
श्री. विनोद धुर्वे
वनपरीक्षेत्र अधिकारी सावली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!