अखेर व्याहाड खुर्दच्या शिक्षिका निलंबित - विद्यार्थ्यांना बेदम मारहाण प्रकरण
सावली (विजय कोरेवार) - तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्वला पाटील या शिक्षिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ माजून सावली पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला. शिक्षण विभागाच्या चौकशीत सत्य आढळल्याने शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद विद्यार्थी शिक्षण घेत असून 28 सप्टेंबर रोजी शिक्षिका उज्वला पाटील हिने सातव्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वर्गात बोलावून पाण्यात द्रव्य मिसळविल्याचा संशय घेत 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यात धनश्री हरिदास दहेलकर, लावण्या कुमदेव चुधरी हे जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारासाठी दाखल केले होते. गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने सावली पोलिसांनी प्रकरण हाताळून त्यांचे विरुध्द अपराध क्र. 226/2024 कलम 118 (1) भा. न्या. से 2023 सहकलम 75 अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून ज़िल्हा परिषदकडे अहवाल सादर केला. महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 चे नियम 3 (1) (ब) मधील तरतुदीनुसार कु. उज्वला गंभीरदास पाटील, विषय शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्याहाड खुर्द पंचायत समिती, सावली यांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले असून राजुरा पंचायत समितीला पाठविण्यात आले आहे.



प्रवीण येरमे
उत्तर द्याहटवाप्रवीण येरमे
उत्तर द्याहटवा