शेतात वीज पडून दोन व्यक्ती गंभीर जखमी
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव इथून जवळ असलेल्या शेगाव खुर्द या ठिकाणी दुपारच्या सुमारास शेतामध्ये वीज पडून दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.सगळीकडे शेतीचा हंगाम सुरू असून विजू उद्धव जांभळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन कापणी सुरू होती आज दुपारी ०३:०० वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकड्यासहित वीज पडून शेतामध्ये विजू उद्धव जांभुळे शेतमालक वय 45 वर्ष तसेच शेतामध्ये सोयाबीन कापणी करीता असणारी मजूर महिला मंजूषा प्रदीप शिरसागर वय 40 वर्ष दोघे जखमी झाले आहे.दोनही शेगाव खुर्द येथील नागरिक आहे त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले असून परिसरात झालेल्या परतीच्या पाऊसाने शेतामध्ये असलेल्या कापूस पिकांचे नुकसान झाले आहे.शेतकरी वर्गात सणासुदीच्या काळात यामुळे चिंता वाढलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!