हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्याबाहेर हाकलण्यास वनविभागाला यश - वनपरीक्षेत्र अधिकारी धुर्वे यांच्या कार्याचे कौतुक
सावली - तालुक्यातील सामदा, वाघोली बुट्टी, सोनापूर, चकपेटगाव, व्याहाड बुज. या भागात हतीच्या कळपाने शिरकाव करीत शेतपिकांची नासधूस सुरु केल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी टीमच्या सहकार्याने हत्तीचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात हाकलल्याने तालुक्यातील जनता त्यांचे कौतुक करीत आहे.
पाच सहा दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी, सेमाना भागातून 27 संख्येच्या हत्तीचा कळप वैनगंगा नदी पार करीत सामदा, वाघोली भागात प्रवेश केला. त्यानंतर त्या भागातील शेतपिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले. वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी पथक तयार करून रात्रंदिवस लक्ष ठेऊन हत्तीना चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेवरून हाकलले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचे कौतुक केल्या जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!