गणेशा इंग्लिश स्कूल आसगाव मध्ये ' जन्मदिवस दिन' साजरा
पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - २ ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस दिन म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात येतो, आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे औचित्य साधून ' गणेशा इंग्लिश स्कूल आसगाव येथे ' जन्मदिवस दीन ' मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष खुशालजी वैद्य सर यांनी केले. त्यानंतर विदयार्थांना आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांचे भाषण,व ईतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात आणि इच्छुक मुलांनी गांधीजी, शास्त्रीजी च्य्या वेसभुसेत सहभाग घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीने कार्यक्रम सादर केले.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमात मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बेबीनंदा पेलणे यांनी केले तर आभार प्रदर्षण सौ. प्रियंका सावरबांधे यांनी केले.यशस्वितेसाठी संस्था अध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी, सौ. बेबीनंदा पेलणे, सौ.प्रियंका सावरबांधे, सौ.वंदना फुंडे,सौ.सुचिता पाटील , सौ.रुबिना माथूरकर, व परिचर श्रीमती नंदा उपथळे यांनी सहकार्य केले.व शेवटी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!