सिंगापूरच्या धर्तीवर होणार चंद्रपूरात झू—पार्क

 सिंगापूरच्या धर्तीवर होणार चंद्रपूरात झू—पार्क

चंद्रपूर शहरातील मूल रोडवरील वन अकादमीला लागून असलेल्या खुल्या जागेत भव्य झू—पार्कची निर्मीती होणार आहे.  हे झू—पार्क सिंगापूरच्या जगप्रसिध्द झू—पार्कच्या धर्तीवर तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सिंगापूरचे झू—पार्कची डिजाईन तयार करणारी आर्किटेक्ट कंपनीलाच चंद्रपूरातील झू-पार्कची डिजाईन तयार करण्यांचे काम दिले असून, हे पार्क आंतरराष्ट्रिय दर्जाचे असेल.  यातून चंद्रपूरात मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढणार आहे. पर्यायाने रोजगारही वाढेल याकडे त्यांनी मीट द प्रेसच्या माध्यमातून लक्ष वेधले. ताडोबातील अतिरिक्त वाघ या झू—पार्क मध्ये ठेवण्यात येणार असल्यांने, सध्या सुरू असलेले मानव—व्याघ्र संघर्ष कमी होण्यास या पार्कची मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रेस क्लब मूलच्या वतीने आयोजीत 'मीट द प्रेस' या कार्यक्रमात एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी ही गोड माहिती दिली.

आपण जे काही करतो, ते उत्तमातील उत्तम करतो.  मी जीथे—जीथे जाते, तेथील चांगल्या गोष्टी आपल्या जिल्हृयात का नसावे? असा प्रश्न मला पडतो आणि तसेच उत्तम निर्मीती आपण जिल्हयात करत असतो.  आपण एकदा बंगलोर येथे जावून तेथील भव्य पार्क पाहील्यानंतर, असेच पार्क चंद्रपूरला असावे असा निश्चय केला.  त्यातून बॉटनीकल गार्डन उभे झाले, या गार्डनला दरमहिण्याला सरासरी पाच लाख पर्यटक भेट देत आहेत.  यातून निसर्गाच्या अभ्यासासोबतच, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला.  पर्यटन वाढले असेही त्यांनी सांगीतले.  देशातील सर्वोत्तम सैनिक शाळेची निर्मीती बल्हारपूरात झाल्यांचे सांगून, देशभरातील सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शालेय खेळ खेळण्याकरीता, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे अध्यक्षतेखालील सरंक्षण मंत्रालयाच्या बैठकीत बल्हारपूरात हे राष्ट्रीय खेळ घेण्यात यावे असा एकमताने निर्णय घेतल्यांचेही त्यांनी सांगून चंद्रपूर जिल्हयासाठी ही अभिमानाची बाब असल्यांचे त्यानी स्पष्ट केले.

मंत्री म्हणून आपण उत्तमातातील उत्तम निर्माण करू, मात्र या वास्तूची, पार्कची व्यवस्था चांगली राहीली पाहीजे यासाठी समाजाच्या सहभागाचीही गरज असल्यांचे त्यांनी सांगून, कुण्या एका इमारतीची एखादी टाईल्स निघाली तरीही मंत्र्यावर टिका होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

चंद्रपूर 

#Zoo-Park

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!