ब्रम्हपुरी विधानसभा भाजपच्या कृष्णा सहारे यांना उमेदवारी जाहीर - भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता


 ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार हे निश्चित झाले असून ही जागा भाजपकडे असून कृष्णा सहारे यांना उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. पण या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

        कृष्णा सहारे हे चिमूर विधानसभा क्षेत्रातील असून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. 
काँग्रेसचे हेविवेट नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सोबत त्यांची लढत होणार आहे. उमेदवार हे बाहेरील क्षेत्राचे असून ब्रम्हपुरी क्षेत्रात फार संपर्क नसल्याने क्षेत्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपकडून प्रशांत वाघरे, अविनाश पाल यांची नावे चर्चेत असतांना अचानक कृष्णा सहारे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सावली तालुक्यात सोशल मीडियावर सार्वजनिक नाराजी व्यक्त करतांना भाजपचे कार्यकर्ते दिसत आहे. त्यामुळे नाराजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!