गणेशा इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात संपन्न
पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस आणि शिक्षक दिन म्हणून भारत देशात साजरा करण्यात येतो.आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे औचित्य साधून गणेशा इंग्लिश स्कूल आसगाव येथे शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष खुशालजी वैद्य सर यांनी केले. त्यानंतर विदयार्थांना आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांचे भाषण, नुत्य,गीते,व ईतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन स्वयंशासन अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीने वर्ग व विषय निवडून अध्यापन व शाळेतील प्रशासन सांभाळण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी केले.सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कामात मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बेबीनंदा पेलणे यांनी केले तर आभार प्रदर्षण सौ. प्रियंका सावरबांधे यांनी केले.यशस्वितेसाठी संस्था अध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी
सौ. बेबीनंदा पेलणे, सौ.प्रियंका सावरबांधे,सौ.वंदना फुंडे,सौ.सुचिता पाटील ,सौ.रुबिना माथूरकर, व परिचर श्रीमती नंदा उपथळे यांनी सहकार्य केले.व शेवटी विद्यार्थ्यांना प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!