तंटामुक्ती अध्यक्षानी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून महसूल पाथकास केले सुपूर्द

शिरपूर ग्रामपंचायत चा नावीन्यपूर्ण उपक्रम 

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - शिरपूर येथील तंटामुक्ती अध्यक्षानी अवैध रित्या रेतीने भरलेला ट्रॅक्टर वाहतूक करतांनाचे दृश्य बघून स्वतः ट्रॅक्टर पकडून ग्रामपंचायत शिरपूर येथील आवारात लावून महसूल पाथकाशी तात्काळ मोबाईलद्वारे संपर्क साधून महसूल पथकास बोलाविले आणि स्वतः ग्रामस्थांसमोर पंचनामा केला. पंचनाम्यावर स्वाक्षरी करुन तंटामुक्ती अध्यक्षाची जबाबदारी पार पाडली व पांचनामा करुन रेतीने भरलेला ट्रॅक्टर चिमूर तहसील याठिकाणी जप्त करण्यात आला.या घटनेमुळे रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!