भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याचे रेतीची वाहतूक करतांना पकडले गावकऱ्यांनी ट्रॅक्टर
चिमूर तालुक्यातील शिरपूर येथील घटना
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या गोरवट येथील रेती घाटावर अवैधरित्या मोठया प्रमाणात रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष तसेच स्थानिक नागरिकांनी पकडला असून ट्रॅक्टर मालकावर महसूल विभागाने कार्यवाही करून ट्रॅक्टर चिमूर तहसील कार्यालय येथे जप्त करण्यात आले आहे.गोरवट तसेच शिरपूर येथील रेती घाटातून नेहमीच सर्रासपने भरदिवसा रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन रेतीची तस्करी सुरु असते. आताची ताजी घटना आहे काही दिवसा अगोदर ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा मृत्यू झाला तर तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या असून महसूल प्रशासन सुस्त बसला असल्यागत चित्र जनतेला दिसून येत आहे. ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने नागरिक त्रस्त झाले असून रात्रीला झोप लागेनासे झाले आहे.भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविला जातो यामुळे दुचाकी चालकांना सुद्धा प्रवास करतांना भीती बाळगावी लागत आहे. भाजप च्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची ट्रॅक्टर असल्यामुळे अनेकदा वाद विवादाची स्पर्धा सुद्धा अनेकदा घडली आहे. तर महसूल प्रशासनाच्या हातातून पकडलेले ट्रॅक्टर सुद्धा हिसकावून पळवून नेल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत व तहसीलदार यांनी पोलीस प्रशासनाकडे सुद्धा याबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत. असे असतांना सुद्धा या मुजोर रेती माफियांची दादागिरी वाढतच चालल्याचे यावरून स्पस्ट होते. काही दिवसाअगोदर भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय भाजपचे कार्यकर्ते राकेश दशरथ भोयर उर्फ ( धम्मा ) राहणार वडाळा पैकू यांचे ट्रॅक्टर चिमूर पोलिसांनी पकडले होते तेव्हा सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. व त्यानंतर चिमूर तहसीलला सुद्धा अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आले होते.असे असतांना सुद्धा महसूल प्रशासनाची या रेती माफिया भाजप कार्यकर्त्यांमध्ये भीती नसल्याने गावाकऱ्यांनी एकमत करुन यांना धडा कशाप्रकारे शिकविता येईल असा निर्णय करुन तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावकरी मिळून आज दिनांक. १८/०९/२०२४ ला सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास शिरपूर याठिकाणी ट्रॅक्टर मुंडा क्रमांक.MH34 CJ 0118 ट्रॉली क्रमांक. MH 34 CT 1541 ला पकडून ग्रामपंचायत ला लावण्यात आले. आणि महसूल पथकाला याबाबतची माहिती देऊन तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनात दहा तलाठी घटनास्थळी रवाना करुन पंचनामा करीत हि कारवाई करण्यात आली असून या माफियांवर कठोर कारवाई न केल्यास हे दृश्य नेहमीच जनतेला बघायला मिळेल अशी सर्वत्र चिमूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!