कर्नाटकातील खोटी माहिती पसरविणारे व समाजात तेढ निर्माण करणारे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा- मोहन पंचभाई

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारची खोटी बातमी प्रसारित करून व चुकीची वक्तव्यं करून दोन समाजात तेढ निर्माण करणे, मानहानी करणे, शांतता भंग करणे असे अनेक प्रकारे केलेले आहेत. या लोक प्रतिनिधींनी खोटी माहिती पसरवून आणि धार्मिक अशांतता निर्माण केलेली आहे. या व्यक्ती महत्त्वाच्या पदावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदार या पदावर असून त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात गंभीर चूक केली आहे. 

भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीने भंडारा शहर पोलिस ठाण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे तसेच इतर संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरूद्ध तक्रार दाखल केली असून यावर एफआयआर नोंदवली जावी अशी विनंती केली आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे युती सरकारचे प्रयत्न आम्ही चालवून घेणार नाही. त्याविरूद्ध वेळोवेळी आवाज उठवला जाईल.

त्यावेळी यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे माजी आमदार अनिल बावनकर, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष जयश्रीताई बोरकर, सभापती रमेश पारधी जि. प. भंडारा, सभापती स्वातीताई वाघाये जि. प. भंडारा, महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई हेडाऊ, महिला शहर अध्यक्ष स्मिताताई मरगडे, सारिकाताई नागदेवे, सदस्या सरिताताई कापसे जि. प. भंडारा, सदस्या विद्याताई कुंभरे जि. प. भंडारा, पूजा ठवकर, नम्रता बागडे, प्रेमसागर गणवीर, धनराज साठवणे, महेंद्र वाहने, विजय शहारे, राजेश चोपकर, मनोज बागडे, मदन गजभिये, योगराज झलके, प्रमोद मानापुरे, प्रेमलाल टेंभूरकर, राजेश हटवार, कृष्णकांत बघेल, प्रशांत देशकर, नरेंद्र रामटेके, भाऊ कातोरे, लियाकत खान, माणिकराव गायधने, रिजवान काजी, किशोर राऊत, सुरेश मेश्राम, धनंजय तिरपुडे, पृथ्वीराज तांडेकर, राजूभाऊ निर्वाण, सुभाष आजबले, मेहमूद खान, अरविंद भालाधरे, प्रमोद तितीरमारे, विजय कापसे, दिलीप कापसे, भोजाराम तलमले, श्यामभाऊ बेंदवार, शमीम शेख, बिट्टू सुखदेवे, आवेश पटेल, राजेश ठाकरे, मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!