चिमूर नगर परिषदेवर धडकला हजारो महिलांचा मोर्चा
नगर परिषद समोर घागरी फोडून लावली मुर्दाबाद ची नारे
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - नगर परिषद क्षेत्रातील अनेक विविध प्रकारच्या २६ मागण्यासाठी ७४ - चिमूर विधानसभा डॉ.सतिश वारजूकर यांच्या नेतृत्वात हजारो महिलांनी एकत्र येऊन काँग्रेस कार्यालयापासून घागर एल्गार मोर्चा काढून नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन नगर परिषदेच्या प्रवेश द्वारासमोरच नगर परिषद प्रशासन मुर्दाबाद - मुर्दाबाद या प्रशासनाचे करायचे काय खाली डोकं वरती पाय अशी नरेबाजी करीत घागरी फोडून संताप व्यक्त केला. जोपर्यंत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी येणार नाही तोपर्यंत महिला हटणार नाही अशाप्रकारची खडेबोल महिलांनी तसेच काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांनी यावेळी बोलले.मोर्चाला हिंसक वळण येईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना चिमूर पोलिस स्टेशन चे निरीक्षक संतोष बाकल यांनी मध्यस्थी करीत हिंसक आंदोलन शांत केल्याने होणारा अनर्थ टळला. डॉ सतिश वारजूकर यांनी निवेदन आम्ही वरिष्ठ अधिकारी यांनाच देऊ या भूमिकेवर ठाम राहून तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी तातडीने नगर परिषद कार्यालयला भेट दिली. व मोर्चाचे रूपांतर सभेमधे झाले. यावेळी मोर्चाला उपस्थित गडचिरोली चिमूर मतदार संघांचे खासदार डॉ.नामदेव किरसान,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर, चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिश वारजूकर,तालुका अध्यक्ष विजय पाटील गावंडे,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा महासचिव गजानन बुटके,प्रज्ञा राजूरवाडे यांनी मार्गदर्शन केले. मोरच्याची आक्रमकता लक्ष्यात घेता पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी जमावाला शांत ठेवण्यासाठी सर्व परिस्थिती वर लक्ष ठेऊन शांतता भंग होणार नाही याकडे पूर्ण वेळ देऊन शांतता कायम ठेवली.मोर्चाला हजारो महिला व बेरोजगार युवक तसेच काँग्रेसच्या सर्व महिला व पुरुष पदाधिकारी यांनी उपस्थिती राहून घागर एल्गार मोर्चाला सहभाग नोंदवित मोर्चा यशस्वीरित्या पार पडला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!