मोर्चा च्या दणक्याने मुख्याधिकारी यांची तडकाफडकी बदली
हजारोंच्या संख्येने मोर्चाला महिलांची उपस्थिती
नगरपरिषद समोर घागर फोडून महिलांनी नगरपरिषद विरोधी लावली नारे
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. २० सप्टेंबर रोजी चिमूर नगर परिषदेवर महिलांचा घागर व सुशिक्षित बेरोजगारांचा एल्गार मोर्चा एकूण २६ मागण्यांना घेऊन धडकला असून विकास कामामध्ये झालेला भ्रष्टाचार (१) भ्रष्ट्राचारी मुख्याधीकारी हटाव व चिमूर नगरपरिषद बचाव. २) नगरपरिषद क्षेत्रात पिण्याचे गोड पाणी मिळालेच पाहीजे. ३) चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील निवासी अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करुन पट्टे वाटप झालेचं पाहिजे. ४) नगर परिषद भागात २४ तासात २४ वेळा विज जात असल्यामुळे १३२ के.व्हि. चे नविन पॉवर स्टेशन झालेच पाहिजे. ५) बालाजी सागर तलाव मधील भ्रष्ट्राचाराची चौकशी झालीच पाहीजे. व उर्वरीत कामे त्वरीत पुर्ण झालीच पाहीजे. ६) नागरीकांच्या व महिलांच्या तक्रारीवरुन आबादी वार्डातील देशी दारुचे दुकाने बंद करुन दिलेला नगरपरिषदेचा ना-हरकत रद्द झालाच पाहिजे. ७) गरीबांसाठी बालाजी रायपुरकर सभागृहाचे भाडे त्वरीत कमी झालेच पाहीजे. तसेच जुने कंत्राट तात्काळ रद्द करुन नगरपरिषदेने ते स्वतः चालविलेच पाहीजे. ८) बहुजन समाजाला भुलथापा न देता संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज सार्वजनिक सभागृह हे नगरपरिषदेच्या मालकीचे असुन त्या समाजाच्या विश्वस्तांना नोंदणीकृत संस्थेला पहीले हस्तांतरीत झालेच पाहीजे. ९) चिमूर नगरपरिषद अंतर्गत वाजवी दरात शिक्षणाच्या व आरोग्याच्या उत्त्तम सोयी उपलब्ध झाल्याच पाहीजे. १०) १० वर्षा पासुन बंद असलेली नगरपरिषद क्षेत्रातील रोजगार हमी योजना सुरु झालीच पाहीजे. ११) चिमूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये वडाळा (पैकु) येथील काडकुड नगर मध्ये पिण्याचे पाणी, नाली, रस्ते, इलेक्ट्रिक पोल, लाईट व बांधकामे झाली पाहीजे. १२) चिमूर नगर परिषद क्षेत्रामध्ये ज्या - ज्या घरगुती नळ कनेक्शनवर पाणी पुरवठा होत नाही. त्या कनेक्शनची थकीत नळ बिल माफ झालेच पाहिजे. १३) चिमूर शहरालगत असलेल्या सातनाल्यावरील पुल, माणिकनगरकडे जाणारा पुल, वेलकम नगर व कवडशी रोडी कडे जाणारा पुल बांधकाम झालेच पाहीजे. १४) उमा नदिचे खोलीकरण करुन सौदर्याकरण झालेच पाहीजे. १५) जुने जन्म व मृत्यु दाखले त्वरीत मिळालेच पाहीजे. १६) नगरपरिषदेच्या निवडणूका ओ.बी.सी. आरक्षणासह झाल्याच पाहीजे. १७) नगपरिषद क्षेत्रातील नाल्या दरमहा सफाई झाल्याच पाहीजे. १८) चिमूर नगरपरिषद क्षेत्रात डेंगु व साथिची लागण वाढल्यामुळे त्यावर उपाय योजना व प्रतिबंधात्मक फवारणी तात्काळ करुन स्वच्छता झालीच पाहीजे. १९) नगरपरिषदेवरील प्रस्थापित दलालाचे व भाटाचे राज्य संपुष्टात आलेच पाहीजे. २०) एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., व्हि.जे.एन.टी. चा घरकुलाचा कोटा वाढलाच पाहिजे व घरकुलाच्या निधीत वाढ झालीच पाहीजे तसेच घरकुलाचा शेवटचा टप्पा दिलाचं पाहीजे. २१) नरगपरिषदेने वाढविलेला टॅक्स कमी झालाचं पाहीजे. २२) आठवडी बाजाराची समस्या सुटलीच पाहिजे. २३) पाईप लाईन साठी खोदलेले रस्ते तात्काळ दुरुस्ती झालेचं पाहिजे. २४) माहिती अधिकारातील माहिती मुदतीत मिळालीच पाहीजे. २५) प्रशासकीय काळामध्ये नगरपरिषद (ग्रामिण) निकृष्ट दर्जाचे विकास कामांची उदा. रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, स्वच्छता यावर चौकशी झालीच पाहीजे. २६) जुने चांगले रस्ते फोडूण नविन रस्ते बांधणे हे चूकिचे आहे. त्या ऐवजी नविन कॉलोणी मध्ये कच्चे रस्ते वर सिमेंट रोड बांधायलाचं पाहिजे. या जनतेच्या रास्त मागण्या घेऊन हजारोच्या संख्येने चिमूर नगरपरिषदेवर महिलांचा घागर व सुशिक्षित बेरोजगारांचा एल्गार मोर्चा धडकल्याने नगर परिषद विरोधी खडेबोल आणि महिलांची तथा सुशिक्षित बेरोजगारांची आक्रमकता व नगर परिषदेतील विकास कामात झालेला कोट्यावढी रुपयांचा भ्रस्टाचार बघून शासनाने चिमूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड यांची तडकाफडकी नागपूर येथील गोधनी रेल्वे याठिकाणी नगर पंचायत ला बदली केली.या तडकाफडकी बदलीची चिमूर नगरपरिषद क्षेत्रात तसेच जिल्ह्यात सर्वत्र राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!