शासकिय आश्रम शाळेच्या नविन इमारत बांधकासाठी कंत्राटदार करतो अवैध रेतीचा वापर
कंत्राटदारावर महसुल विभाग कार्यवाही करणार का?
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - जांभुळघाट येथील शासकिय आश्रम शाळेच्या आवारामध्ये काही दिवसापासुन करोडो रुपयांची नविन इमारत बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा कंत्राटदार वापर करीत आहे.आज सुद्धा अवैध रेतीचा वापर होत आहे. हि रेती चिमुर वरून रेती माफीया चार ते पाच ट्रॅक्टर द्वारे रात्रोला टाकीत आहे. पण महसुल विभाग गाड झोपीत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.महसुल विभागाचा रेती माफीयाला आर्शिवाद तर नाही ना ? हा बांधकाम करोडो रुपयांचा असल्याने महसुल विभाग चौकसी करणार का ? खुलेआम कंत्राटदार अवैध रेतीचा वापर शासकीय इमारतीवर करीत आहे. जिल्हा अधिकारी किंवा महसुल विभाग कार्यवाही करून कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करणार का ? अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शासकीय इमारत बांधकामासाठी अवैध रेतीचा वापर कंत्राटदार करीत असेल आणि सामान्य नागरीकांचे लहान घराचे बांधकाम करीत असल्यास त्यांच्या बांधकामावर लागणाऱ्या रेतीवर महसुल विभाग यांचेकडून कार्यवाही केली जाते तर करोडोचे बांधकाम थांबवून अवैध असलेली रेती व अवैध मुरम विकत घेणे सुद्धा गुन्हा आहे व उत्खनन करणाऱ्या माफिया तसेच कंत्राटदार यांचेवर कार्यवाही व्हायला हवी. अन्यथा सर्व सरकारी यंत्रना हि सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली तर काम करीत तर नाही ना ? हे यावरून सिद्ध होईल अशी चर्चा जनतेमध्ये सुरु आहे.चिमुर तालूक्यामध्ये विविध मोठे कंत्राटदार गुजाराती समुदायाचे असल्याने कार्यवाही करायला अधिकारी हिम्मत दाखवित नाही.याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांनी जाहीर सभेत कोन जिल्हा अधिकारी कोन तहसिलदार सत्ता आम्हचीच आहे मी बघूण घेईल किंवा कोण आपल्या पक्षाच्या पदाधिकारी यांच्या कामाला अडवतो अश्या प्रकारचे दम पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी सत्ताधारी प्रदेश अध्यक्ष देत असेल तर नक्की पदाधिकारी,कार्यकर्ता यांची हिम्मत वाढणारच? यामुळे अधिकारी व कर्मचारी सत्ताधारी पक्षाच्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्यास हिम्मत दाखवीत नाही असे सर्वत्र जनते कडून बोलले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!