सायखेडा येथे गुणवंत विद्यार्थी व खासदार डॉ नामदेवराव किरसान यांचा सत्कार

सावली:-.  सायखेडा येथील श्री बाल गणेश मंडळाने अनेक वर्षाची परंपरा कायम राखत याही वर्षी स्पर्धा परीक्षा, सामाजिक उपक्रम अंधश्रध्दा निर्मूलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि नवनियुक्त गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे मान खासदार डॉ नामदेवराव किरसान यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार डॉ नामदेवराव किरसान हे होते तर उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खुशाल लोडे हे होते. 

    यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यां अनन्या राजु वाघरे वर्ग 6 वा,गौरी कविंद्र चुधरी वर्ग 6 वा,प्रतिक पत्रु चरडे वर्ग 6 वा शालेय स्कॉलरशिप  परिक्षेत प्रावीण्य मिळवून उत्तम मार्क मिळवले त्याकरिता त्या विद्यार्थांचा संचालक खुशाल लोडे आणि  भागेश टेंभूर्णे कडून प्रोत्साहन पर भेट आणि १४ उत्कृष्ठ लेझिम आणि बँड पथकाच सुधा खुशाल लोडे आणि   युवा सामाजिक कार्यकर्ता  भागेश टेंभूर्णे  यांचे वतीने सत्कार करण्यात आला. 

  यावेळी श्री बाल गणेश मंडळ चे अध्यक्ष, सदस्य निखिल वाढनकार, महेश साखरे, राकेश साखरे, बबलू पालपनकर, मुन्ना पालपनकर, अखिल मुंघाटे, पेटा मुंघाटे, दिनेश कोरडे, दादू लोडे,  अमोल डाखोटे, मनोहर पालपणकर, विठ्ठल मंगर, विठ्ठल वाढनकार, काशी अण्णा, अमित साखरे, शामराव वाघरे, नानाजी मुंघाटे, उद्धव कोरडे, इत्यादी श्री बाल गणेश मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!