ई-पीक पाहाणी म्हणजे शेतकऱ्यांना योजनेपासुन वंचित ठेवण्याचा सरकारचा घाट - संचालक खुशाल लोडे यांचा आरोप
सावली: तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार यांनी खरीप हंगामासाठी १ आगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत ई पिक पाहणी करण्याचे प्रसार माध्यमाद्वारे आवाहन केले आहे.त्यामध्ये त्यांनी सांगतिले कि,जे शेतकरी ई पिक पाहणी अप्सवर पिकाची नोंद करणार नाहीत त्यांना शेतीचे नुकसान भरपाई, विविध योजना, शासनाच्या वेळोवेळी मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहावे लागेल. महाराष्ट्र शासन डिजिटल काळानुरूप शासन प्रणालीत बदल घडवून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मात्र शेतकरी वर्गाला डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत नसल्याने शासनाच्या डिजिटल प्रणालीला पुरेसा वाव देऊ शकत नाही आहेत.शेतकरी वर्ग मोबाईलचा वापर जरी करीत असला तरी तो फोन लावणे, फोन उचलणे, गाणे व युट्युब वरील व्हिडिओ बघणे, फोटो काढण्या पुरताचा मर्यादित आहेत.त्यामुळे
अश्या शेतकरी वर्गाला ऍप्सचे, संगणकीय, मोबाईलचे ज्ञान असणाऱ्या वर्गाच्या विनवण्या करावी लागत आहे. त्यातही कुणी मदत न केल्याने शेतकऱ्याला ई- पिक पाहणी पिक पेरा करण्यापासून अलिप्त राहण्याची वेळ आली आहे. मग शेतकरी तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या प्राधिकरणाने यावर त्वरित उपाययोजना आखून शेतकऱ्यांना ई पिक पाहणी ऍप्सचे ज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची महत्वाची गरज भासत आहे. तालुका स्तरावर यासाठी तात्काळ प्रयत्न करून योग्य उपाय कार्यान्वीत करावे अशी मागणी सावली कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक खुशाल लोडे आणि ई पिक पहनी यासाठी कंटाळलेल्या शेतकरी वर्गाकडून होत आहे.
ई-पिक पाहणी करीता शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार उपाययोजना करावी अशी मागणी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक खुशाल लोडे, युवा कांग्रेस उपाध्यक्ष शुशील डहलकार, दुष्यंत मंगर, विठ्ठल मंगर, तिलक वाढनकर, राजू ठाकरे, हेमंत धुर्वे, गजानन धुर्वे, डंबाजी चौधरी, श्रीकांत सगिडवार, खुशाल चुधरी, वामन दाजगाये, रोहन राउतकर, गौतम साखरे, रमेश खेडेकर, प्रशांत मलोडे, नितिन चिमुरकर, लंकेश लाकड़े, सदानंद मारभते, आशीष आखाड़े, शेखर चौधरी, विनोद भंडारे, प्रभाकर भोयर, आकाश येनप्रेडीवार, सुनील हुलके, पुंडलिक वाढनकर, संजय गेडाम यांनी केली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!