सावली येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा - विजय वडेट्टीवार मित्र परिवाराचा उपक्रम
सावली - सावली येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मित्र परिवारच्या सौजन्याने तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपालांना उत्कृष्ट नंदीबैल सजावटीसाठी पुरस्कार देण्यात आला.
सावली शहरात गुजरी चौक येथे तान्हा पोळा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मित्र परिवाराच्या सौजन्याने साजरा करण्यात आला. यावेळी विजय वडेट्टीवार यांचेकडून सहभागी बालगोपालांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. नंदी बैल सजावट, वेशभूषा, प्रबोधनात्मक, सामाजिक संदेश देऊन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या बालगोपालांना सामाजिक कार्यकर्ते उद्योजक रोहित बोम्मावार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक अमोल नाडेमवार, व्यावसायिक रविंद्र ताटकोंडावार, नगरसेवक गुणवंत सुरमवार यांचेकडून स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन सावली नगरपंचायतचे उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रीतम गेडाम, नगरसेवक नितेश रस्से, नगरसेविका साधना वाढई, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका ज्योती शिंदे, नगरसेविका सिमा संतोषवार, अंजली देवगडे, नगरसेविका प्रियंका रामटेके, माजी उपाध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले, माजी नगरसेवक संतोषवार, निखिल दुधे, आकाश खोब्रागडे, चंद्रकांत संतोषवार, चंद्रकांत गेडाम, सुनील ढोले, गजेंद्र मानापुरे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!