आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे भारतीय मसाले माहिती,प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न


आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे भारतीय मसाले माहिती,प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न

वरोरा..... जगदीश पेंदाम


भारताची खाद्य संस्कृती जगविख्यात आहे . या खाद्य संस्कृतीत भारतीय 
मसाल्याना विशेष महत्त्व आहे. जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या मसाल्याचे विद्यार्थ्याना महत्त्व समजावे आणि मसाले केवळ अन्नपदार्थांचे चव वाढविणारे पदार्थ नसून त्यात औषधी गुणधर्म सुद्धा आहेत याविषयी माहिती मिळावी म्हणून आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय मसाल्याचे प्रदर्शन भरविण्यात आले .
पोस्टर तयार करून त्यावर मसाल्यांची माहिती, मसाल्याचे विविध भाषेतील आणि शास्त्रीय नाव तसेच त्याचे गुणधर्म आणि उपयोगिता प्रदर्शित करण्यात आली. 30 भारतीय मसाल्याचे पोस्टर तयार करण्यात आले यात 60 विद्यार्थी सहभागी झाले, काळी मिरी, दालचिनी, ओवा, सोप, कलौजी, अनारदना, जीरा, केसर, लाल मिरची, हिंग, आमचूर,कलमी, जयपात्री, तमाल पत्र इत्यादी सह अनेक मसाले प्रदर्शित करण्यात आले.प्रदर्शनी चे उद्घाटन प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या हस्ते व उपप्राचार्य राधा सवाने यांच्या उपस्थितीत झाले .
प्रदर्शनाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख मानसी काळे, संगीता घड्याळ पाटील यांनी केले. सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रदर्शन आयोजना करिता सहकार्य लाभले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!