राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तर्फे पवनी नगर परिषद क्षेत्रात येणारे सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे याबाबतचे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पवनी नगरपरिषद क्षेत्रात येणारे सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले.पवनी येथील रस्त्याला खड्ड्याचे साम्राज्य तयार झाल्यामुळे गणेश विसर्जन करते वेळेस गणेशजी च्या मूर्तीला कोणत्याही प्रकारची ईजा व झटके लागू नये किंवा गणेश जी च्या मूर्तीचे नुकसान होऊ नये यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचे कडून या अगोदर सुद्धा रोड दुरुस्तीबाबत चे निवेदन देण्यात आलेले होते.परंतु पवनी नगरपरिषद यांच्या निष्काळजीपणामुळे पवनीतील रोडची अवस्था हि फारच दैनिय झालेली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या मनात नगरपरिषद पवनी यांच्या विरोधात मनस्ताप वाढलेला असून जर अनंत चतुर्थीच्या दिवसापर्यंत संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास श्री बाप्पाच्या मूर्तीचे अवमान व अवहेलना किंवा अपमान झाल्यास या घटनेला सर्वस्वी पवनी नगर परिषद चे मुख्याधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
व अनेक गणेश मंडळ एकजुटीने एकत्र येऊन निवेदने नगर परिषदेला सादर केले. यामध्ये प्रामुख्याने प्रियदर्शनी गणेश मंडळ विघ्नहर्ता गणेश मंडळ बालमित्र गणेश उत्सव मंडळ नवयुग बाल गणेश मंडळ व पवनीतील सर्व गणेश मंडळ यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून गणेश मंडळाचे अध्यक्ष कमलाकर रायपूरकर, सचिव प्रशांत भोगे, अध्यक्ष वसंत पुरोहित, सचिव शशिकांत रायपूरकर,अध्यक्ष रोशन वंजारी, सचिव वेनुदास शिवरकर, राकेश हटवार,साहिल शेख, परवेज खान,गोलू बेग,सबी पटेल,निखिल गोंडाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!