येवती साजातील तलाठीच्या निष्काळजीपणामुळे ,गारपीट ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित..
येवती साजातील तलाठीच्या निष्काळजीपणामुळे ,गारपीट ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित..
शेतकर्यांना मदत जाहीर करून निष्क्रिय तलाठी यांच्यावर कारवाई करावी.. अभिजित कुडे
वरोरा....जगदीश पेंदाम
तालुक्यातील येवती साजातील तलाठीच्या निष्काळजीपणा मुळे ,गारपीट ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित असुन रब्बी हंगामातील चणा, गहु पिकावर गारपीट होऊन शेतकर्यांची अतोनात नुकसान झाले होते. तालुक्यातील बाकी भागातील पंचनामे होऊन शेतकर्यांना मदत मिळाली पण निवेदन देऊन देखील येवती परिसरातील शेतकऱ्यांना तलाठी यांच्या आडमुठेपणा पंचनामे केले नाही त्यामुळे नागरी, उखर्डा, येवती, केळी, वाघनख गावातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिला आहे. निवेदन देऊन देखील वारंवार तक्रारी करूनही तलाठी यांच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने दखल घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी आक्रमक भूमिका घेणार. अश्या निष्क्रिय तलाठी ला जाब विचारला पाहिजे. सतत शेतकर्यांच्या आडमुठेपणा करत त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तलाठी साजा वर हजर राहत नाही. कॉल घेत नाही. अनेक तक्रारी करून देखील प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहेत. नुकसान होऊन देखील त्यांना पंचनामे करण्यास अडचण काय, निवेदन देऊन देखील पंचनामे करण्यात का आले नाही, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण? तात्काळ शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व भागात नुकसानभरपाई मिळाली पण फक्त उखर्डा, नागरी, येवती, केळी, वाघनख याच गावातील शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. नुकसान होऊन देखील शेतकर्यांची पंचनामा झाला नाही, मनमानी कारभारामुळे शेतकर्यांची नुकसान झाले आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून शेतकर्यांना मदत द्यावी अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेवून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांनी दिला आहे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!