भंडारा जिल्ह्यातुन ग्रामपंचायत मोखारा आदर्श सन्मानित

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : -  पवनी तालुक्यातील आदर्श स्मार्ट ग्राम, निर्मल ग्राम म्हणुन पुरस्कृत असलेल्या ग्राम पंचायत मोखारा च्या पदरात पुन्हा एका पुरस्काराची भर पडली आहे.सन २०२२ - २३ मध्ये संत गाडगेबाबा ग्रास्वच्छता अभियानात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत नी सहभाग घेतला होता त्यावेळेस जिल्हा चमू द्वारे सहभागी सर्व ग्राम पंचायत ची पाहाणी झाली होती. यामध्ये मोखारा ग्रामपंचायतने सुद्धा सहभाग घेऊन ग्राम पंचायत पदाधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांच्या अनमोल सहकार्यातुन पुरस्कार खेचुन आणला आज स्वातंत्र्यदिनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावीत यांचे शुभहस्ते जिल्हाधिकारी योगेशजी कुंभेजकर,मा.खासदार प्रशांतजी पडोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी समिरजी कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या उपस्थितीत मोखारा गावचे सरपंच प्रशांतभाऊ भुते व सचिव के.जे. दोनोडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सरपंच प्रशांतजी भुते, उपसरपंच गिरीष नखाते, सचिव दोनोडे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना समस्त गावकरी तथा परीसरातील जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मिळालेला पुरस्कार म्हणजे गावकरी व सर्व पदाधिकारी यांनी केलेल्या मेहनतीचे फळ असुन येणाऱ्या काळात आम्हाला खुप समोर जायचे आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी सरपंच प्रशांतभाऊ भुते यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!