नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी साकारली प्रतिकृती
पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिन पार पाडण्यात आला. यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष सर्व सदस्य गण पवनी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी व मान्यवरांनी या ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली त्यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखरभाऊ जिभकाटे यांनी परमपूज्य महात्मा गांधी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून ध्वजाची पूजा केली व ध्वज फडकवण्यात आला. नंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त थोडक्यात मनोगतही व्यक्त केले.तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सुद्धा स्वातंत्र्य दिना निमित्त आपापले भाषणे वाचून दाखवली.यावेळी अतिथी म्हणून प्रगती बँकेचे अध्यक्ष कमलाकर रायपुरकर , राकेशभाऊ बबन रायपुरकर , सक्सेना शाळेचे माजी मुख्याध्यापक जन बंधू सर , व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सलामे मॅडम , सदस्य सुभाष भाऊ रायपूरकर , मुंडलेजी व इतर सदस्य शाळेतील मुख्याध्यापक अनिल चेतुले सर , सहाय्यक शिक्षक ज्योतीताई हिंगे, हेमंत सोनवले, मोनिका रायपूरकर ते श्वर्या मॅडम यांच्या संपूर्ण उपस्थितीमध्ये हा ध्वजारोहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!