नवभारत सहकारी पतपेढी संस्था मर्या मूल ची आमसभा संपन्न

10 आणि12 वी चे गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार 


(मूल)
आज दिनांक 18/08/2024 रोजी येथील स्थानिक नवभारत कन्या विद्यालय मुल येथे नवभारत सहकारी पतपेढी संस्था मर्या. मूल द्वारे आमसभा आयोजित करण्यात आलेली होती त्या आमसभेत 10 वी 12 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर पुढील सभेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विविध विषयांवर सदर आमसभेत नवभारत सहकारी संस्था च्या उन्नती व प्रगती करिता साधक-बाधक चर्चा संचालक मंडळ व सभासद यांच्यामध्ये करण्यात आली.
सदर सभेचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष श्री किसनराव वासाडे सर व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री जिद्दीवर सर , मोडक सर, शेंडे सर, कार्तिक नंदूरकर प्रा. कापगाते मॅडम, देवीदास म्हशाखेत्री, वनकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव श्री नौकरकर सर तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री रामटेके सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!