सादागड येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण - विकास कामासाठी संपर्क करण्याचे बिडीओंचे आवाहन

 


सावली - तालुक्यातील आदिवासी बहुल गाव अशी ओळख असलेल्या सादागड येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांच्या हस्ते पार पडला.

      सावली तालुक्यातील पण टेकाडी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेले सादागड या गावात जुनी अंगणवाडी इमारत जीर्ण झाल्याने नवीन अंगणवाडी बांधकाम होऊन स्वातंत्र्यदिनानिमित्त गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. सादागड येथील अंगणवाडी, शाळा यांचा प्राधान्याने प्रश्न सोडवू व विकासात्मक कामासाठी येऊन भेटा ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिले. यावेळी टेकाडीचे सरपंच सतीश चौधरी, माजी सभापती विजय कोरेवार, सहाय्यक गटविकास अधिकारी जगन्नाथ तेलकापल्लीवार, टेकाडीचे उपसरपंच शंकर सिडाम, ग्रामसेविका चिमुरकर, शरद मडावी, पुप्पलवार शिक्षक, प्रभाकर सिडाम, राजू कंचावार, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता मंगाम, अरुणा कुमरे, दीना गोवर्धन, अमित भडके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप येनुगवार यांनी केले.



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!