'आमचं ठरलयं' ! म्हणत "या" उमेदवारांनी सुरू केला 'प्रचार'

 'आमचं ठरलयं!' म्हणत "या" उमेदवारांनी सुरू केला 'प्रचार'

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या 90 दिवसात होणार आहे.  मागील पाच वर्षापासून राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. भाजप—शिवसेनेची पारंपरागत युतीत मुख्यमंत्री पदावरून तणाव निर्माण झाले त्यातून, शिवसेना—राष्ट्रवादी कॉंग्रेस—कॉंग्रेस अशी अभद्र युती तयार झाली.  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले.  मात्र भाजपाला 105 आमदार निवडूण आणूनही सत्तेत बसता न आल्याचा राग भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी, ठाकरे सरकारवर आरोपाच्या फैर्या झाडीत काढला. पुढे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडून भाजपानी अनैसर्गीक युतीचे सरकार स्थापन केले. हे सरकार मात्र जनतेला रूचले नसल्यांचे, लोकसभा निवडणूकीच्या निकालातून जनतेनी दाखवून दिले.

अशाच गोंधळाच्या वातावरणात विधानसभेच्या निवडणूकीच्या तयारीला राजकीय पक्ष, निवडणूक आयोग, प्रशासनासह, इच्छुक उमेदवारही लागले आहे.  या वेटींग आमदारांना, जनतेच्या प्रश्नांचा अलिकडे प्रचंड कळवळाही यायला लागला आहे. 

चंद्रपूर लोकसभा निवडणूकीत, कॉंग्रेसला सर्वच मतदार संघात आघाडी मिळाल्यांने, या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.  13 च्या वर कॉंग्रेस नेत्यानी भाजपाचे हेवीवेट उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात उमेदवारी मागीतली आहे.  यातील काहीनी प्रचाराचा धडाकाही लावला आहे. #Sudhir Mungantiwar

'आमच ठरलयं' म्हणत, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष, जिल्हयाचे जेष्ठ कॉंग्रेसनेते संतोष रावत यांनीही विविध कार्यक्रम, भेटी—गाठी आणि दौर्याच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे.  'आमच ठरलय' या संतोष रावत समर्थकांनी सुरू केलेल्या व्हाट्सअप ग्रुपवरून, बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातील उमेदवारीसाठी संतोष रावत हेच कसे प्रबळ उमेदवार आहेत, हे त्यांचे समर्थक विविध दाखल्यांच्या माध्यमातून जनतेला दाखवून देत आहे.  याच माध्यमातून संतोष रावत यांनी केलेले राजकीय व सामाजीक कामेही सांगून, रावत यांची उमेदवारी कशी मजबूत आहेत याचे समर्थन करीत आहे. #Santosh Rawat

कॉंग्रेस पक्षात उमेदवारी कुणाला देणार, तिकीट कुणाला मिळणार, पंजाचे ए,बी फार्म कुणाच्या नावांने मिळेल हे साक्षात ब्रम्हदेवही सांगू शकत नाही, मात्र प्रत्येक इच्छुक उमेदवार, आपल्याला xxxxx यांनी तयारी करायला सांगीतली हे सांगत, 'पंजा' माझाच म्हणून प्रचार सुरू केला आहे.  संतोष रावत यांचे समर्थकांनी 'आमच ठरलय!' म्हटले असले तरी, 'पक्षश्रेष्ठीच काय ठरलय?' यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.


विजय सिध्दावार

9422910167

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!