वैनगंगा विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जीभकाटे )
पवनी : - स्थानिक वैनगंगा शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वैनगंगा सार्वजनिक व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ७८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम वैनगंगा शिक्षण संस्थेचे सचिव विनोद मेंढे, संचालिका भावना तर्वेकर, संचालिका कुंदा आक्रे, प्राचार्य पराग टेंभेकर, वैनगंगा पब्लिक ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अजय ठवरे, मयुरी वैद्य पब्लिक स्कूलच्या प्राचार्या लीना कोरेकर यांनी भारत मातेला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
वैनगंगा शिक्षण संस्थेचे सचिव विनोद मेंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विज्ञान मंडळाच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे सादर करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते समूह गीत सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका वैशाली जीवनतारे यांनी केले. तर आभार शिक्षक भोजराज दिघोरे यांनी मानले. यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!